सौरभ चौधरी

भारतीय नेमबाज


सौरभ चौधरी (११ मे २००२) हा एक भारतीय नेमबाज आहे. तो एअर पिस्तूल प्रकारात नेमबाजी करतो. तो उत्तर प्रदेशातील मीरत जिल्ह्यातील कलिना गावचा रहिवासी आहे. त्याचे वडील जगमोहनसिंग शेतकरी आहेत आणि आई ब्रजेशदेवी गृहिणी आहे.

सौरभ चौधरी
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव सौरभ चौधरी
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक ११ मे, २००२ (2002-05-11) (वय: १८)
उंची ६ फूट
वजन ७५ किग्रॅ
खेळ
देश भारत
खेळ नेमबाजी
खेळांतर्गत प्रकार एअर पिस्तूल
क्लब वीर शामल रायफल क्लब

सुरुवातीचे दिवससंपादन करा

अमित शेओरोन यांच्या बागपत जवळील बेनोली येथील वीर शाहमल रायफल अकादमीमध्ये २०१५ मध्ये सौरभने नेमबाजीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.[१] सौरभने काही स्पर्धांमध्ये जिंकून या खेळातील चमक दाखवल्यावर त्याच्या वडिलांनी लोकांकडून पैसे गोळा करून त्याला पिस्तूल घेऊन दिले. त्याचे माध्यमिक शिक्षण बागपत येथील आदर्श विद्यापीठ, इंटर कॉलेज येथून झाले. सध्या तो तोलाहन इंटर कॉलेजमध्ये शिकत आहे.[२]

कारकीर्दसंपादन करा

२०१८ आशियाई क्रीडा स्पर्धासंपादन करा

२०१८ साली इंडोनेशियामधील जकार्ता, पालेमबँग येथे झालेल्या आपल्या पदार्पणाच्या आशियाई स्पर्धेत सौरभने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवले.[३] या स्पर्धेत २४०.७ गुण मिळवून त्याने आशियाई स्पर्धेत विक्रम नोंदवला.

आशियाई युवा ऑलिम्पिक २०१७संपादन करा

डिसेंबर २०१७ मध्ये आशियाई युवा ऑलिम्पिकच्या पात्रता स्पर्धेत सौरभने ज्युनिअर विश्वविक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदक मिळवले.

आयएसएसएफ ज्युनिअर विश्वचषक स्पर्धा २०१८संपादन करा

जून २०१८ मध्ये जर्मनीत झालेल्या आयएसएसएफ ( International School Sport Federation) ज्युनिअर विश्वचषक स्पर्धेत सौरभने नवीन ज्युनिअर विश्वविक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदक मिळवले.[४]

आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धा २०१८संपादन करा

दक्षिण कोरियातील चांग्वेन येथे सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या आयएसएसएफ स्पर्धेत ज्युनिअर १० मीटर एअर रायफल प्रकारात सौरभने सुवर्णपदक पटकावले.२४५.५ गुण मिळवून त्याने स्वतःचाच विश्वविक्रम मोडून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. [५] याच स्पर्धेत सौरभ चौधरी,अर्जुनसिंग चीमा आणि अनमोल यांनी सांघिक रौप्य पदक जिंकले.

युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २०१८संपादन करा

ऑक्टोबर २०१८ मध्ये ब्युनॉस आयर्स येथे झालेल्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सौरभने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवले.[६]

आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धा २०१९संपादन करा

 • भारतातील नवी दिल्ली येथील डॉ.कर्णी सिंग शूटिंग रेंजवर फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या आयएसएसएफ स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सौरभने वयाच्या सोळाव्या वर्षी वरिष्ठ गटातील सुवर्णपदक पटकावले.२४५.० गुण मिळवून त्याने नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. तसेच भारतासाठी टोकियोमध्ये २०२० साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी या स्पर्धा प्रकारात कोटा मिळवला.[७][८]
 • याच स्पर्धेत सौरभने मनू भाकरच्या साथीने मिश्र दुहेरी गटात १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले.[९]


संदर्भसंपादन करा

 1. ^ "Farmer's son Saurabh Chaudhary shoots Asian Games gold on senior debut at 16 - Times of India ►". The Times of India. 2018-09-08 रोजी पाहिले.
 2. ^ "यूपी ही नहीं पूरे देश को है इन पर गर्व, शूटिंग का 'गोल्डन बॉय' बनकर सबको चौंकाया- Amarujala". Amar Ujala. 2018-09-08 रोजी पाहिले.
 3. ^ "Farmer's son Saurabh Chaudhary shoots Asian Games gold on senior debut at 16 - Times of India ►". The Times of India. 2018-09-08 रोजी पाहिले.
 4. ^ "ISSF JWC: शूटर सौरव चौधरी ने किया भारत का सिर उंचा, विश्व रिकॉर्ड के साथ जीता गोल्ड- Amarujala". Amar Ujala. 2018-09-08 रोजी पाहिले.
 5. ^ "सौरभ चौधरी ठरला 'ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियन'-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-09-08 रोजी पाहिले.
 6. ^ "युवा ऑलिम्पिक: सौरभ चौधरीचा 'सुवर्णवेध'". Loksatta. 2018-10-11. 2018-10-11 रोजी पाहिले.
 7. ^ "Flash News: India's Saurabh triumphs on his home court". ISSF (इंग्रजी भाषेत). 2019-02-24 रोजी पाहिले.
 8. ^ "ISSF World Cup : भारताच्या सौरभचा विश्वविक्रम, सुवर्ण पदकासह 'ऑलिम्पिक'भरारी". Loksatta. 2019-02-24 रोजी पाहिले.
 9. ^ "WC: मनू-सौरभ जोडीची सुवर्णपदकावर मोहोर". Maharashtra Times. 2019-03-08 रोजी पाहिले.