सोर्पे धरण
सोर्पे धरण जर्मनीच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील सोर्पे नदीवरील धरण आहे. या धरणाची क्षमता ३,३८,००,००० मी३ आहे. याची बांधणी १९२६ ते १९३५ दरम्यान झाली होती. या धरणातील पाण्याचा वापर पिण्यासाठी तसेच औद्यौगिक वापरासाठी होतो. याशिवाय हे धरण जलविद्युत निर्मितीकरता आणि पर्यटनासाठी वापरले जाते. हे धरण तेथील सुंडेर्न या छोट्या गावापाशी आहे.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश वायुसेनेने एका धाडसी मोहीमेत या धरणावर हल्ला चढवून हे फोडले होते.[१]जर्मनीने अटलांटिक भिंतीवर काम करणारे बिगारी कामगार येथे आणून हे धरण काही महिन्यांत दुरुस्त केले होते.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "1943: RAF raid smashes German dams". BBC. 1943-05-17. 2007-05-17 रोजी पाहिले.