सोनेरी वानर ही वानरांमधील एक जात आहे ( शास्त्रीय नाव - Trachypithecus geei) ही वानरे फक्त भारत-भूतान मधील मानस राष्ट्रीय उद्यानात दिसून येतात. इतर वानरांपेक्षा ही जात अत्यंत दुर्मिळ आहे व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

सोनेरी वानर[]

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: प्रकृष्ट
कुळ: Cercopithecidae
जातकुळी: Trachypithecus
जीव: T. geei
शास्त्रीय नाव
Trachypithecus geei
(Khajuria, 1956)

सोनेरी वानर

नावा प्रमाणेच ह्या वानराची फर सोनेरी रंगाची असते म्हणून यास सोनेरी वानर असे म्हणतात. याची उंची साधारणपणे अर्धामीटर पर्यंत असते व वजन १०-१२ किलोपर्यंत भरते. झाडांची पाने व फळे हा यांचा मुख्य आहार आहे. इतर वानरांप्रमाणेच हेही वानर मुख्यत्वे कळप करून रहातात. कळपाचा म्होरक्या नर असतो व इतर माद्या असतात[].

संदर्भ

संपादन
  1. ^ ग्रोव्ज कॉलिन. जागतिक सस्तन प्राण्यांच्या प्रजाती (इंग्रजी भाषेत). p. १७६. 2012-01-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ सोनेरी वानराची माहिती[permanent dead link]

बाह्य दुवे

संपादन