सोनगिरी

(सोनगिरी (भूम) या पानावरून पुनर्निर्देशित)

सोनगिरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील सोनगिरी एक गाव आहे.

  ?सोनगिरी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर भूम
जिल्हा धाराशिव
भाषा मराठी
सरपंच N.M. मारकड
बोलीभाषा मराठी
कोड
आरटीओ कोड

• एमएच/२५

भौगोलिक स्थान

संपादन
सोनगिरी हे स्थान बालाघाट पर्वतरांगा मध्ये असून सुंदर असे दोन तलाव याच्या मध्ये गाव आहे. भूम पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले धाराशिव जिल्ह्यातील आगळे-वेगळे गाव हे कुंथलगिरिपासून जवळच आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध खव्याच्या पेढ्याचे  व  भगवान महावीर (जैन) मंदिरचे ठिकाण म्हणजे कुंथलगिरी.

हवामान

संपादन

येथे समप्रमाणात पाऊस व समप्रमाणात कोरडे उष्ण हवामान आहे. त्यामुळे ज्वारी पीक घेतले जाते.

लोकजीवन

संपादन
येथील लोकांचे जीवनमान हे शेती व दुग्ध व्यवसाय 

निगडित भरपूर प्रमाणात आढळतो.

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

प्रेक्षणीय स्थळ हे सोनगिरीच्या उत्तरेकडील बाजूला बाणगंगा तलाव हा प्रेक्षकांचे मन वेधून घेणार आहे. भगवान बाबा मंदिर हे सोनगिरी गावाच्या मध्ये बुरुजावर प्रशस्त ठिकाणी बांधण्यात आलेले आहे. पश्चिम बाजूस भव्य संत बाळूमामा मंदिर आहे.

नागरी सुविधा

संपादन

नागरिकांसाठी शासकीय कामकाज करण्यासाठी भारत सरकारचे कॉमन सर्विस सेंटर उभारण्यात आले . त्याचे संचालक श्रीराम कांबळे हे आहेत.

जवळपासची गावे

संपादन

सोनगिरी येथील जवळपासची गावे भूम, वाकवड, रामकुंड, कुंथलगिरि, चिंचोली, सुकटा ही आहेत.

संदर्भ

संपादन

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/