सोनकी (ग्रॅहम्स ग्राउंडसेल), शास्त्रीय नाव - सेनीशिओ ग्राहमायी (Senecio grahamii), ही सह्याद्रीच्या पठारावर बहुसंख्येने उगवणारी फुले आहेत. यांचे इंग्रजी नाव Catalogue of Plants (Bombay) या पुस्तकाच्या John Graham या लेखकाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. फुले मात्र अस्सल देशी आहेत. कासच्या पठारावर, भूपतगडच्या पठारावर वगैरे अनेक ठिकाणी ही फुले आढळ्तात.

फुलाच्या देठाजवळ लहान पानासारखी रचना असते त्यास छद (bract) म्हणतात. सोनकीच्या फुलाच्या देठापाशी असलेल्या छदप्रकाराला, छदमंडल (Involucre) म्हणतात. यामध्ये अनेक छदे एकत्र येऊन त्यांनी फुलोऱ्याच्या देठाजवळ गोलाकार कडे तयार केलेले असते.

सोनकी या नावाचा र.वा. दिघे यांचा एक कथासंग्रह आहे.