फुलोरा
काही वनस्पतींत खोडाच्या टोकावर किंवा पानाच्या खाचेत एकच फूल येते. काही वनस्पतींत त्याच जागी अनेक फुले येऊन फुलांची गुच्छासारखी रचना तयार होते तिला 'फुलोरा' किंवा 'पुष्पबंध' (Inflorescence) म्हणतात.
- फुलोऱ्याचे विभाग
फुलोऱ्याची रचना अनेक भागांची मिळून बनलेली असते. त्यापैकी मुख्य भाग पुढीलप्रमाणे,
१. पुष्पबंधाक्ष (Peduncle)
फुलोऱ्याच्या मध्य अक्षास पुष्पबंधाक्ष असे म्हणले जाते.
२. पुष्पवृन्त (Pedicel)
फुलोऱ्यातील प्रत्येक फुलाच्या देठास पुष्पवृन्त म्हणतात.
३. पुष्पासन (Receptacle)
काही वेळा फुलोऱ्याचा वरील टोकाचा भाग पसरट तबकडीसारखा होतो त्याला पुष्पासन म्हणतात.
४. छद (Bract)
काही वेळा फुलाच्या देठाजवळ लहान पानासारखी रचना असते त्यास छद म्हणतात.
जर फुलाला छद असेल तर त्याला 'सच्छद फूल' किंवा नसेल तर छदहीन फूल असे संबोधतात.
छदक (Bracteole) काही वनस्पतींमधे फूल व छद यांच्यामधे एक लहान व पातळ रचना असते तिला छदक म्हणतात.
छदांचे पुढीलप्रमाणे काही उपप्रकार असतात,
१. पर्णमय छद (Leafy Bract)- छद पानांप्रमाणे हिरव्या रंगाचे असतात. उदा: जास्वंद, अडुळसा, पिवळी तीळवण.
२. प्रदल छद (Petaloid Bract) - प्रदल छद हे फुलांतील प्रदलांसारखे किंवा पाकळ्यांसारखे रंगीत असते. उदा: बोगनवेल.
३. महाछद (Spathy Bract) - हे छद मोठे व संपूर्ण फुलोऱ्याला वेढणारे असतात. उदा: रानसुरण अळू, नारळ, मका.
४. छदमंडल (Involucre) - यामधे अनेक छदे एकत्र येऊन फुलोऱ्याच्या देठाजवळ गोलाकार कडे तयार करतात. उदा: सूर्यफूल, सोनकी.
५. तुष (Glume)- गवत कुलातील बहुतांशी जातींमधे तुष प्रकारचे छद असतात.
फुलोऱ्यातील फुलांच्या उमलण्याच्या दिशेवरून त्याची दोन मुख्य प्रकारांत विभागणी केलेली आहे.
१. अकुंठित फुलोरा (Racemose Inflorescence)
या प्रकारच्या फुलोऱ्यात अक्षाच्या टोकावर नवीन फुले येतात
आणि आधी उमललेली फुले पुष्पवृन्ताच्या किंवा अक्षाच्या खालच्या बाजूला असतात.
उदा:पळस, गुलमोहर, पिचकारी, शंकासूर
२. कुंठित फुलोरा (Cymose Inflorescence)
- कुंठित फुलोऱ्यात अक्षाच्या तळाला नवीन फूल उमलते त्यामुळे पुष्पवृन्ताची वाढ तिथेच कुंठित होते. उदाहरणार्थ: मोगरा, जाई, जुई.
- अकुंठित फुलोऱ्याचे विविध प्रकार आहेत.
१) एक वर्ध्यक्ष (Raceme) मंजरी
उदा. मुळा, गुलमोहर, राई.
(२) कणीश Spike शुकी.
उदा. आघाडा, काटेमाट, अडुळसा, घटीपित्तपापडा, कोरांटी.
शुकी: तांदुळजा, राजगिरा, कुरडू, कपुरीमाधुरी.
(३) कणिशक Spikelet
उद. गवतवर्ग, गहू, बांबू, ऊस.
(४) नतकणिशक Catkin (निलंबशुकी)
उदा. पानवेल, काळी मिरी, तुती.
(५) स्थूलकणिश Spadix छदशुकी
उदा. केळ, नारळ, सुपारी
(६) गुलच्छ Corymb (चिपिटक)
(७) चामरकल्प Umbel (उच्छत्र)
उदा. जिरे, बडीशेप, गाजर, कोथिंबीर.
(८) स्तबक Capitulum मुण्डक.
उदा. सूर्यफूल, झीनिया, कॉसमॉस, बाभूळ, लाजाळू, कदंब, खैर, शेंबी, शिरस, गारबीज.
- कुंठित वल्लरीय Cymose
(१) खरी वल्लरी (True Cyme)
उदा. परिजात, मोगरा, चमेली, जाई, कस्तूर-मोगरा इत्यादी.
(२) शुंडीवल्लरी Cymose Helicoid.
उदा. बिग्नोनिया,
(३) सर्पगतिवल्लरी Cymose Scorpoid.
उदा. कापूस, हत्तीसूर.
(४) डायचासियल (Dichasial Cyme.)
उदा. जेसिमाइन, नीकटन्थिस, क्लेरोडेन्ड्रान, पिंक.
(५) पालीचासीयल साइम (Polychasial Cyme).
उदा. कलोट्रोपिस कप्रीफोलीयसे घराणे.
(६) कुंभासनी Hypanthodium.
उदा. वड, पिंपळ, उंबर, पाथर, नांद्रुक, अंजीर, भुईउंबर, खरावती, अष्टा.
(७) Verticillaster पुंजावली संयुक्त फुलोरा.
उदा. तुळस व तिच्या जाती, सब्जा, अजगंधा, पुदिना, फांगला, कपुरी-माधुरी, मरवा, पानाचा ओवा
(८) Cyathium: Specialiased Cymose Inflorescence.
उदा. Chrimas Folwer, लालपत्ती Sobertes flower.
- संमिश्र फुलोरा
(१) Mixed panicle. उदा. (Oleaceae घराणे).
(२) Mixed Spadix. उदा. केळी
(३) Cymose Umbel.उदा. कांदा.
(४) Cymose corymb. उदा. सातवीण, कुडा
(५) Thyrsus. उदा. द्राक्षे
संदर्भ
संपादन- सावंत, सदाशिव महाराष्ट्रातील दिव्य वनौषधी, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
बाह्य दुवे
संपादन- ^ फुलोरा हे साप्ताहिक जामखेड जिल्हा अहमदनगर येथुन प्रसिदद्द् होते. सपादक शशि देशमुख्