सेव्हिंग प्रायव्हेट रायन

१९९८ हॉलिवूड चित्रपट


सेव्हिंग प्रायव्हेट रायन हा १९९८ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड चित्रपट आहे. स्टीव्हन स्पीलबर्गचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट २४ जुलै १९९८ रोजी प्रदर्शित झाला. सेव्हिंग प्रायव्हेट रायनचे कथानक दुसऱ्या महायुद्धातील नॉर्मंडीवर दोस्त राष्ट्रांनी केलेल्या हल्ल्यावर आधारित आहे. ह्या चित्रपटात टॉम हँक्सची प्रमुख भूमिका असून मॅट डेमन प्रायव्हेट रायनच्या भूमिकेत चमकला आहे.

सेव्हिंग प्रायव्हेट रायन
दिग्दर्शन स्टीव्हन स्पीलबर्ग
निर्मिती इयन ब्राइस, मार्क गॉर्डन
कथा रॉबर्ट रोडॅट
प्रमुख कलाकार टॉम हँक्स
एडवर्ड बर्न्स
मॅट डेमन
संगीत जॉन विल्यम्स
देश अमेरिका
भाषा इंग्लिश
प्रदर्शित २४ जुलै १९९८
अवधी १६९ मिनिटे
निर्मिती खर्च $७० दशलक्ष
एकूण उत्पन्न $४८१.८ दशलक्ष

सेव्हिंग प्रायव्हेट रायनला जगभरातील प्रेक्षकांचा व टीकाकारांचा उदंड प्रतिसाद मिळाला. विशेषतः स्टीव्हन स्पीलबर्गचे दिग्दर्शन, अचूक ऐतिहासिक संदर्भ, विशेष कलादृष्ये, व प्रमुख कलाकारांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. ७१व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये सेव्हिंग प्रायव्हेट रायनला ११ नामांकने मिळाली ज्यामधील सर्वोत्तम दिग्दर्शकासह ५ पुरस्कार ह्या चित्रपटाने पटकावले.

बाह्य दुवे

संपादन