सूरज बडजात्या
सूरज बडजात्या ( २२ फेब्रुवारी १९६४) हा एक भारतीय चित्रपट लेखक व दिग्दर्शक आहे. सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या मैने प्यार किया व हम आपके हैं कौन..! ह्या दोन सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. राजश्री प्रॉडक्शन्स नावाने त्याची स्वत:ची चित्रपट निर्माण कंपनी आहे. हम आपके हैं कौन साठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार मिळाला.
चित्रपटयादीसंपादन करा
लेखन/दिग्दर्शनसंपादन करा
- मैने प्यार किया (१९८९)
- हम आपके हैं कौन..! (१९९४)
- हम साथ साथ हैं (१९९९)
- मैं प्रेम की दिवानी हूं (२००३)
- विवाह (२००६)
- एक विवाह... ऐसा भी (२००९)
- प्रेम रतन धन पायो (२०१५)
बाह्य दुवेसंपादन करा
- इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील सूरज बडजात्याचे पान (इंग्लिश मजकूर)