सुलतान अहमद मशीद
(सुल्तान अहमद मशीद या पानावरून पुनर्निर्देशित)
सुल्तान अहमद मशीद (तुर्की: Sultan Ahmet Camii) ही तुर्कस्तानच्या इस्तंबूल शहरामधील एक ऐतिहासिक मशीद आहे. ही मशीद ओस्मानी सुलतान पहिला एहमेद ह्याने इ.स. १६०९ ते १६१६ दरम्यान बांधली. ह्या मशिदीच्या आतल्या भागामधील भिंती निळ्या रंगाच्या फरश्यांनी सजवल्या असल्यामुळे ही मशीद निळी मशीद ह्या नावाने देखील ओळखली जाते.
हागिया सोफियाच्या जवळच स्थित असलेल्या सुलतान अहमद मशिदीला एक प्रमुख घुमट, सहा मिनार व आठ छोटे घुमट आहेत. ह्या मशिदीच्या रचनेमध्ये इस्लामिक तसेच बायझेंटाईन वास्तूशास्त्र शैलीचा प्रभाव जाणवतो.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |