सुलभा ब्रह्मनाळकर
डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर या मराठी लेखिका आहेत. त्यांनी छात्रप्रबोधन तसेच उन्मेष प्रकाशन, मौज प्रकाशन, राजहंस प्रकाशन यांसाठी लेखन केले.
त्या व्यवसायाने बालरोगतज्ज्ञ असून त्यांनी इ.स. १९८३मध्ये कऱ्हाड येथे वेद्यकीय सेवा करायला सुरुवात केली.
पुस्तके
संपादन- डॉक्टर म्हणून जग(व)ताना (आत्मकथन)
- गोफ जन्मांतरीचे (२०१२) : उत्कांती आणि जनुकशास्त्र या विषयावरील ग्रंथ
- बंद खिडकीबाहेर (प्रवासवर्णने) : मौज आणि पद्मगंधा दिवाळी अंकातील लेखांचा हा संग्रह आहे.
पुरस्कार
संपादन- गोफ जन्मांतरीचे पुस्तकाला ललितेतर ग्रंथासाठी असणारा डॉ. वि. म. गोगटे पुरस्कार (२५-४-२०१३)
- मसापच्या ११०व्या वर्धापनदिनानिमित्त ग्रंथकार पुरस्कार (२६-५-२०१३)
- सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त "मिळून साऱ्याजणी‘ आणि महात्मा फुले समता प्रतिष्ठानने सावित्री-जोतिबा समता उत्सवात दिलेला पुरस्कार (१२-३-२०१५)
- विलेपार्ले येथील उत्कर्ष मंडळ संस्थेतर्फे दिला जाणारा ग्रंथगौरव पुरस्कार (२०१४)