सुरेश विनायक खरे
सुरेश विनायक खरे (जन्म : २५ जानेवारी १९३८) हे एक मराठी नट, लेखक, दिग्दर्शक, जाहिरातपटकार, चित्रपट पटकथालेखक, नाट्यावलोकनकार, प्रशिक्षक, संवादक, मुलाखतकार, संस्थाचालक आणि मराठी नाटककार आहेत. खरे यांनी लिहिलेले पहिले नाटक म्हणजे ’सागर माझा प्राण’ हे होय.
सुरेश खरे हे मुंबईच्या सिद्धार्थ लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहेत. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी एकांकिकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली.
सुरेश खरे लिखित ’काचेचा चंद्र’मुळे डॉ. श्रीराम लागू आणि ’मला उत्तर हवंय’ या नाटकामुळे विजया मेहता, या अभिनेत्यांचा व्यावसायिक रंगभूमीवरचा प्रवास यशस्वीरीत्या सुरू झाला.
२५ जानेवारी २०१३ या दिवशी सुरेश खरे ७५ वर्षांचे झाले. त्यानंतर त्यांचा अमृत महोत्सव माटुंगा कल्चरल सेंटरतर्फे झाला.
नाट्यावलोकन
संपादनदूरदर्शनवर गाजलेला ’नाट्यावलोकन’ नावाचा नाट्यास्वादाचा कार्यक्रम सुरेश खरे यांनी घेतलेल्या मुलाखतींमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला होता.
दूरदर्शनवरच ’गजरा’” नावाच्या कार्यक्रमात सुरेश खरे यांनी लिहिलेल्या नाटुकल्या सादर होत असत.
संस्था स्थापना
संपादन१९६० साली सुरेश खरे यानी मित्रांच्या साहाय्याने ’ललित कला साधना’ नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे सुरेश खरे यांनी रंगमंचावर अनेक नाटके सादर केली. जेव्हा नाटके मिळेनाशी झाली तेव्हा स्वतःच ’सागर माझा प्राण’ हे नाटक लिहिले आणि त्यांच्यातल्या नाटककाराचा जन्म झाला.
सुरेश खरे यांनी लिहिलेली नाटके
संपादन- अखेर तू येशीलच
- असून नाथ मी अनाथ
- आरोप
- एका घरात होती
- काचेचा चंद्र
- कुणी तरी आहे तिथे
- तिची कथाच वेगळी
- ती वेळच तशी होती
- तुला हवंय तरी काय
- तूच माझी राणी
- पपा सांगा कुणाचे
- मंतरलेली चैत्रवेल
- मला उत्तर हवंय
- मालती माधव आणि मंडळी
- मी एक विदूषक
- याला म्हणायचं तरी काय
- रक्त नको मज प्रेम हवे
- रामनगरी
- वहिनींच्या बांगड्या
- शततारका
- संकेत मीलनाचा
- सखी शेजारिणी
- संगम
- सरगम
- सागर माझा प्राण (१९६६)-राज्य नाट्यस्पर्धेत सादर झालेले नाटक
- स्वर जुळता गीत तुटे
सुरेश खरे यांनी भूमिका केलेली नाटके
संपादन- असून नाथ मी अनाथ
- उदंड जाहले पाणी
- एकाघरात होती
- मला उत्तर हवंय
- माकड आणि पाचर
- माणूस नावाचे बेट
- मालती माधव आणि मंडळी
- शततारका
- शन्ना डे
- श्रीमंत
- सागर माझा प्राण (सुरेश खरे यांनी लिहिलेले पहिले नाटक-इ.स.१९६६)
सुरेश खरे यांच्या कथा,पटकथा, संवाद
संपादन- एक रात्र मंतरलेली (चित्रपट)
- धनंजय
- दूरी (हिंदी)
- मायबाप
सुरेश खरे यांनी दिग्दर्शित केलेली नाटके
संपादन- आरोप
- काचेचा चंद्र
- कुणीतरी आहे तिथं
- गोष्ट दोघांची
- तुला हवंय तरी काय
- मिश्किली
- याला म्हणायचंतरी काय
- रामनगरी
- शन्ना डे
- संकेत मीलनाचा
सुरेश खरे यांनी दिग्दर्शित केलेल्या एकांकिका
संपादन- काळवेळ
- बळी
- लाट फुटली
- लाल गुलाबाची भेट
- सदू आणि दादू
- सारं कसं शांत शांत
- सांगाती
आत्मचरित्र
संपादनसुरेश खरे यांनी ’मी सुरेश खरे’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. ते प्राजक्त प्रकाशन या संस्थेने प्रकाशित केले आहे.
मानसन्मान
संपादन- १९७०आणि १९७२ या दोन्ही वर्षी सुरेश खरे यांना महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेमध्ये पुरस्कार मिळाले.
- १९८६मध्ये खरे यांना नाट्य परिषदेचा गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार व आचार्य अत्रे प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला.
- सुरेश खरे हे एका वर्षी बडोद्याच्यामराठी वाङ्मय परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे संमेलनाध्यक्ष होते.
- १९९५साली खरे यांना नाट्यदर्पणचा गणेश सोळंकी स्मृती पुरस्कार मिळाला.
- १९९९साली त्यांना नाट्य परिषदेच्या चिंचवड शाखेचा जयवंत दळवी पुरस्कार मिळाला.
- सुरेश खरे यांना १९९९ साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबई शाखेकडून नाट्यलेखनासाठीचा राम गणेश गडकरी यांच्या नावाचा गडकरी पुरस्कार मिळाला आहे.
- २०००साली नाट्यपरिषदेचा कृतज्ञता पुरस्कार.
- २००१साली महाराष्ट्र सरकारचा राम गणेश गडकरी पुरस्कार.
- २००२साली महाराष्ट्र कला निकेतनचा मधुसूदन काले्लकर स्मृती पुरस्कार.
- सुरेश खरे हे २००५ साली भरलेल्या ८५व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
- सुरेश खरे हे चेंबूर (मुंबई) येथे २००६ साली भरलेल्या ५व्या विभागीय साहित्त्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
- सुरेश खरे हे २००६साली भरलेल्या १५व्या समाजप्रबोधन साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते.
- खरे यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा नाट्यगौरव पुरस्कारही मिळाला आहे.
पहा
संपादनसंदर्भ
संपादन- सुरेश खरे यांचे संकेतस्थळ Archived 2013-07-19 at the Wayback Machine.