श्री सुरेशानंदजी

श्री सुरेशानंदजी
पूर्ण नावश्री सुरेशानंदजी
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा गुजराती, हिंदी, मराठी, इंग्रजी सहित अनेक भाषा
प्रमुख विषय वेद, राजयोग, भक्तीयोग
प्रभाव आसाराम बापू
प्रभावित भारतातील असंख्य भक्तगण
संकेतस्थळ आश्रम.ओर्ग्
  • ऑगस्ट २००० मध्ये पूज्य बापूजीनी सुरेशानंदजीना युनैटेड नेशनच्या वर्ल्ड रिलीजस आँरगेनाइजेशन द्वारा आयोजित मिलेनियम सम्मीट मध्ये आपला प्रतिनिधि म्हनून पाठवले
  • जानेवारी १९८४ मध्ये सुरेशानान्दजीना वयाच्या १३ व्या वर्षी पूज्य बापूजींद्वारा दिक्षेचा प्रसाद मिळाला.
  • श्री बापूजींचा विशेष दूत म्हणून श्री सुरेशानंदजीनी बरेच सत्संग पश्चिमेच्या न्यूयार्क , अटलांटा , शिकागो , कैलिफोर्निया , बोस्टन ,टोरंटो, कनाडा येथील आध्यात्मिक बाबतीत उपाशी लोकांना दिले. त्यांचे भजन व कीर्तन युक्त सत्संग ऐकून हजारो लोक साधे व आरोग्यदाई जीवन जगू लागले. त्यानी योग, ध्यान व प्राणायामाची बरीच शिबिरे घेतली
  • पूज्य बापूजींच्या अशिर्वादाने श्री सुरेशानंदजी भारताच्या विभिन्न शहरात नेहमी सत्संग Archived 2008-09-26 at the Wayback Machine. करीत असतात

स्वामी सुरेशानान्दजी द्वारा स्वता:ची आत्मकथा अशी सांगितली आहे :

माझे सुरुवातिचे आयुष्य फारच दु:खी आणि नारकीय होते. अत्यंत दु:खी असताना असेही वाटायचे की देवाने आता माझे आयुष्य संपवून टाकावे. मी २ वर्षांचा आसताना माझी आई वारली. मी, माझा भाऊ व २ बहिणी असे चोघेही अत्यन्त दुखी झालो. पिताजींनी दुसरे लग्न केले. माझ्या सावत्र आईला २ मुले झाली. आम्हाला असे वाटायचे की ती खरच सावत्र आईसारखी वागते आणि म्हणुनच मी व माझा भाऊ घरून पैसे चोरून पळून जायचो. आम्हाला वेळ कसा घालवायाचा हे कळत नव्हते. मग आम्ही सिनेमा बघायाचो, उनाड पोरांबरोबर मैत्री करून वेळ घलवायाचो. जेव्हा घरात पैसे नसायचे अथवा ते गुप्त ठिकाणी ठेवलेले असयाचे, तेव्हा घरातील वाडीलांच्य़ा दुधाच्या धंन्द्याची ताम्ब्याची मोठी भांडी चोरून विकायाचो आणि मग उगाचच भटकत रहायचो. उनाड पोरांनी मला विड़ी प्यायला शिकाविली. घरच्यानां वाटले की दोन्ही भावांना अलग अलग केले तर कदाचित सुधारतील. म्हणून भावाला आत्याकडे मद्रासला पाठवले. एकटा रहिल्यावर तर मी घर सोडून जास्तच पळु लागलो. घरचे खूप पैसे बर्बाद केले. कोणीही नातेवाइक मला जवळ करण्यास तय़ार नव्हते. सर्वच माझा तिरस्कार करीत असत.
आईचे प्रेम मी कधीच पाहिले नव्हते. वय़ाची १३ वर्षे फक्त छळ आणि दुःखच पाहिले होते. पण गुरूदेवंचे इश्वरी प्रेम बघा ! आपले सद्गुरूदेव !! जे श्री रामाप्रमाणे चरित्र्यवान, कृष्णाप्रमाणे रूपवान आणि शिवाप्रमाणे सद्भावी आहेत, ज्यांचा प्रतेक शब्द हा स्वयं सीध्ध मंत्र आहे, शास्त्र आहे, अशा आदरणीय सद्गुरूदेवानी मला सर्व काही दिले. असे दिवस काढत असताना १९८३ सालातील सप्टेम्बर चा पहिला आठवडा उगवला. त्या दिवशी वडीलांनी असे सांगितले की आता या पुढे माझ्यासाठी त्यांच्या घरात जागा नाही. हा माझ्यासाठी खूपच मोठा धक्का होता. आता जावू कुठे ? करू काय ? काही सुचत नव्हते. असेही वाटले की जावून जीव द्यावा. अशा विचित्र परिस्थितीत मला एकच आधार आठवू लागला, तो म्हणजे कृपाळु श्री सद्गुरूदेवांचा !! ह्रुदयाच्या टोकापसून मी त्यांचा धावा केला. सच्च्या हृदयाची हाक श्री सद्गुरूदेवापर्यंत पोहचाली. दुसरे दिवशी श्री सद्गुरूदेवांच्या प्रेरणेने मी अहमदाबादच्या पवित्र भुमीत पोहचलो. माझ्या साठी कोणा कडेही जागा नव्हती. पण परब्रह्म परमात्मा स्वरूप गुरूदेवांच्या कृपेने त्यांच्या चरणांशी मला जागा मिळाली. जानेवारी १९८४ चा मकर संक्रान्तीचा दिवस माझा सर्वात भाग्यदायक होता. त्या दिवशी श्री सद्गुरूदेवांनी माझ्यावर कृपा करून दीक्षा मला दिली. माझ्या जुन्या वाईट सवई धुवून टाकून श्री सद्गुरूदेवंच्य दैवी प्रेमाचा अनुभव मला मिळाला

.....जो जन्मणार तो मरणारच. पण सद्गुरूदेव ब्रह्मज्ञान देतात, सुखः आणि दुःखाच्या भवसगरपार पोचवतात, जन्म मृत्युच्या चक्रातुन सोडवतात. अशा सद्गुरूदेवांना पाहून शीष्याची सारी पापे नष्ठ होतात, सद्गुरूदेवांच्या स्पर्शाने कर्माच्या अकाट्य चक्रातुन मुक्ति होते. सद्गुरूदेवांची वाणी ऐकून जीवनातील मायेचा भ्रम नष्ठ होतो. हा माझा व करोडो गुरूभाऊ आणि बहिणींचा अनुभव आहे.