सुमो (जपानी: 相撲) हा जपान देशामध्ये खेळला जाणारा एक पारंपरिक खेळ आहे. कुस्तीचा एक प्रकार असणाऱ्या सुमो खेळामध्ये दोन खेळाडू एकमेकांना रिंगणाच्या बाहेर ढकलण्याचा किंवा खाली पाडण्याचा प्रयत्न करतात.

दोन सुमो खेळाडूंची लढत
Disambig-dark.svg

ऐतिहासिक काळापासून खेळल्या जात असलेल्या सुमो खेळाला शिंतो धर्मामध्ये महत्त्व आहे. जपानचा राष्ट्रीय खेळ मानला जाणाऱ्या सुमोमध्ये आजही शिंतो धर्मामधील अनेक जुन्या व पारंपारिक पद्धती वापरात आहेत व व्यावसायिक सुमो पैलवानांना त्या पाळणे बंधनकारक आहे.

मंकाजो 萬華城 व गोतेन्यू 剛天佑 दरम्यान झालेल्या लढतीचा संक्षिप्त व्हिडियो


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

व्यावसायिक सुमो कुस्ती स्पर्धा व सोहळ्यांची अधोरेखित करणारी बाब म्हणजे महिलांवरील बहिष्कार![१] स्पर्धा किंवा दोह्योच्या (सुमो कुस्तीचा आखाडा) सर्कलला स्पर्श करण्यासही महिलांना बंदी आहे.

इतिहाससंपादन करा

सुमो [२] कुस्तीचा इतिहास जपानइतकाच प्राचीन आहे. आठव्या शतकापूर्वीपासून सुमो कुस्ती अस्तित्वात होती. यापूर्वी हा खेळ ‘सुमाई’ या नावाने ओळखला जात होता. सुमोचा इतिहास खोदून काढायचा असेल तर सुमारे १५०० वर्षे मागे जावे लागेल. यायोई कालखंडापासून (इसवीसनपूर्व ३००) पारंपरिक पद्धतीने हा खेळ खेळला जातो. जगातील सर्वांत प्राचीन समजल्या जाणाऱ्या या खेळाला इडो कालखंडात (1603 आणि 1868) व्यावसायिक स्वरूप आले.

  1. ^ Pathade, Mahesh. "सुमो कुस्ती (भाग-२)". Kheliyad. 2020-03-09 रोजी पाहिले.
  2. ^ Pathade, Mahesh. "सुमो कुस्तीचा इतिहास". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले.