सुनीलकुमार लवटे
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
डॉ.सुनीलकुमार लवटे हे मराठी भाषेतील लेखक आहेत. त्यांचा जन्म ११ एप्रिल, १९५० रोजी पंढरपूर येथे झाला. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण. हिंदी विषयात एम.ए.व पीएच. डी. प्राथमिक शिक्षण व बालपण पंढरपूरमध्ये. पुढे कोल्हापूरमध्ये उर्वरित शिक्षण व जगणे. उच्च शिक्षणासाठी गारगोटी येथील मौनी विद्यापीठात प्रवेश. तिथे परिस्थितीच्या जाणीवेने खडतर अध्ययन. भारत सरकारची शिष्यवृत्ती व महाराष्ट्र शासनाचा निर्वाह भत्ता या बळावर ग्रामीण विद्यापीठाच्या पदवी समकक्ष शिक्षक पदविकेत भारतात सर्वप्रथम. ’रोल ऑफ ऑनर’ ने भारत सरकारकडून सन्मानित. शालेय वयात साने गुरुजींचे साहित्य, वि.स. खांडेकरांचा सहवास, थोरामोठ्यांची व्याख्याने, आंतरभारती घडण यामुळे आयुष्यभर समर्पित शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य म्हणून कार्य करत निवृत्त. जीवनाच्या प्रत्येक वळणावर समरसून काम करण्याची वृत्ती. त्यामुळे प्रत्येक वेळी ’अशक्य ते शक्य करिता सायास’चा ध्यास. हायस्कूल शिक्षक असतानाच डॉक्टरेट मिळवून महाविद्यालयात. महविद्यालयात पुस्तके लिहून विद्यापीठात. प्राचार्य म्हणून उपक्रमांचा उच्चांक. अशा सतत ऊर्जस्वलतेमुळे जगण्याचा अनिवार ध्यास. सन २०१० मध्ये निवृत्त. त्यातूनच मग स्वावलंबनानंतर अनाथांच्या संगोपन व पुनर्वसन कार्यासाठी १९८० ते २००० असं दोन दशके अविरत सक्रिय प्रयत्न. कोल्हापूरच्या ’रिमांड होम’चे ’बालकल्याण संकुल’ मध्ये रूपांतर. महाराष्ट्र राज्य वंचित संस्थेचे अध्यक्षपद. ’समाज सेवा’ त्रैमासिकाचे संपादन. भारतीय शिष्टमंडळातून युरोप, आशिया खंडातील १५ देशांचे अभ्यास दौरे. त्यातून महाराष्ट्रभरच्या अनाथाश्रम, रिमांड होम्ससंबंधी प्रशासन यंत्रणा विकेंद्रीकरण, योजनांचे एकत्रीकरण, संस्था दर्जा सुधारणा, बालक धाेरण, बालकांचा राष्ट्रीय कायदा व ह्नकासंबंधी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तराचे कार्य व सन्मान. सध्या सर्व पदांचा त्याग. मुक्त कार्यरत. हे सारे करीत मराठी, हिंदीत विपुल लेखन. आत्मकथा, लेखसंग्रह, कथासंग्रह, भाषण संग्रह, काव्य संग्रह, याशिवाय भाषांतर, संपादन, समीक्षात्मक लेखन. लेखनास महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका), भाषांतर व समीक्षेस भारत सरकारचे राष्ट्रीय पुरस्कार. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी जीवन गौरव, महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्काराने गौरव. अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. महाराष्ट्रात अनेक वस्तुसंग्रहालयांंची निर्मिती.
डॉ. सुनीलकुमार लवटे | |
---|---|
डॉ. सुनीलकुमार लवटे | |
जन्म |
११ एप्रिल, १९५० पंढरपूर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | मराठी |
राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे नवी दिल्ली येथील जिल्हाधिकारी म्हणून तपभर काम. कारागृह पोलीस चौकी सुधारणा व बंदी बांधवांना मानवाधिकार प्रदान. कोल्हापूरच्या वंचित विकास, शिक्षण, साहित्य, संस्कृती उपक्रमांची नोंद घेऊन ’कोल्हापूर भूषण’ हा नागरी सन्मान. पुरस्कार, लेखन, व्याख्याने, मानधन, ’सामाजिक संकल्प निधी’ मानून आजवर मिळालेल्या सुमारे दहा लाख रुपयांची रक्कम विविध शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक संस्थांना व व्यक्तींंना अर्पण. साहित्य कृतीची हिंदी, गुजराती, इंग्रजी, ब्रेलमध्ये भाषांतरे. अनेक आकाशवाणी केंद्रांवरून या आत्मकथेचे अभिवाचन प्रसारण. अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आत्मकथेचा पाठ्यपुस्तक म्हणून समावेश.
अध्यापन कार्य
संपादनविविध माध्यमिक विद्यालयांत हिंदी अध्यापन (१९७१ ते १९७८)
महावीर महाविद्यालयात हिंदी अध्यापन (१९७९ ते २०१०)
प्राचार्य म्हणून महावीर महाविद्यालयात कारकीर्द (२००५ ते २०१०)
शिवाजी विद्यापीठात एम्.ए., हिंदी अध्यापन (१९८० ते २०१०)
य.च.म.मु. विद्यापीठ - एम् फिल. अध्यापन (२००६ ते २००९)
विविध मराठी, हिंदी प्रशिक्षण शिबिर, चर्चासत्र, कार्यशाळेत मार्गदर्शन/बीजभाषण/उद्घाटन/व्याख्याने.
संशोधन
संपादनयशपाल, शंकर शेष, अ.गो.शेवडे, वि.स.खांडेकर यांच्या जीवन व साहित्यसंबंधी मूलभूत संशोधन
एम् फिल. (१५), पीएच्.डी.(५) विद्यार्थ्यांना संशोधन मार्गदर्शन.
संपादन
संपादन* समाजसेवा (त्रैमासिक)(१९८९ ते १९९३)
सांस्कृतिक कार्य संयोजनः
संपादनमहाराष्ट्र राज्य वंचित बालक, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव (१९८५)
हिंदीतर भाषी हिंदी नवलेखक शिबीर (२००७)
मराठी नवलेखक शिबीर (२०११)
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक महोत्सव (२०११)
त्रिभाषा सूत्र परिषद, सांगली (१९८२)
बहुभाषी काव्य संमेलन (१९९८)
राष्ट्रीय छात्र सैनिका एकात्मता राष्ट्रीय शिबीर (२००६)
साधना साहित्य संमेलन (कथा), कोल्हापूर (२०११)
हिंदी प्रचार/प्रसार कार्य
संपादनमहाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे; शिवाजी विद्यापीठ प्राध्यापक परिषद यांच्या सहकार्याने हिंदी प्रचार, प्रसार, अभ्यास केंद्र संचालन, ग्रंथालय, परीक्षा संयोजन, त्रिभाषा सूत्र परिषद, नवलेखक शिबीर, अभ्यास सहली, कवी संमेलन, ग्रंथ प्रदर्शन, परिसंवाद इत्यादीचे आयोजन.
समाजकार्य
संपादनअनाथ, निराधार मुले, मुली व महिलांच्या संगोपन, शिक्षण, सुसंस्कार व पुनर्वसनाचे उल्लेखनीय कार्य (१९८० ते २०००)
महिला व बालकल्याण राज्यस्तरीय संस्थेचे शासननियु्नत अध्यक्ष म्हणून कार्य (१९९६ ते १९९८)
वस्तुसंग्रहालय निर्मिती
संपादनशिवाजी विद्यापीठात वि.स. खांडेकर स्मृती संग्रहालयाची अभिनव निर्मिती (२००४)
वि.स.खांडेकर विद्या प्रतिष्ठान, शिरोडे, ता.वेंगुर्ला, जि.सिंधुदुर्ग येथे वि.स.खांडेकर स्मृती संग्रहालय (२०१६)
साने गुरुजी स्मृती संग्रहालय साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर, जि.रायगड (२०११)
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे स्मृती संग्रहालय, बार्शी (२०१५)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यायापीठ, नाशिक येथे यशवंतराव चव्हाण स्मृती संग्रहालय (२०१६)
रेडिओ/ दूरदर्शन प्रसारण
संपादनकोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, बारामती इ. केंद्रावरून मराठी व हिंदीत अनेक भाषणे, मुलाखती प्रक्षेपित. ’खाली जमीन वर आकाश’ या आत्मकथेचे अभिवाचन प्रसारित
अनेक वृत्तवाहिन्यांवर चर्चा, प्रतिक्रिया मुलाखती प्रक्षेपित.
विदेश प्रवास
संपादनभारत - फ्रान्स मैत्री अंतर्गत फ्रान्स, स्विट्झर्लंड, ऑस्ट्रिया, इटली, जर्मनी, इंग्लंड, बेल्जियम, लक्झेंबर्ग व्हॅटिकन देशांना भेटी व अभ्यास (१९९०)
अनाथांच्या संगोपन व पुनर्वसन अभ्यासार्थ जपानला गेलेल्या भारतीय सरकारच्या शिष्टमंडळात सदस्य (१९९६)
हाँगकाँग, सिंगापूर, मलेशिया, थायलंड देशांचा साहित्यिक व सांस्कृतिक दौरा (२०११)
मराठी साहित्य संपदा
संपादनआत्मकथा
संपादन- आत्मस्वर (२०१४)
- खाली जमीन वर आकाश (२००६) (पुरस्कारप्राप्त)
समीक्षा ग्रंथ
संपादन- भारतीय भाषा व साहित्य (२०१७)
- भारतीय साहित्यकार (२००७)
- समकालीन साहित्यिक (२०१५)
लेखसंग्रह
संपादन- एकविसाव्या शतकातील समग्र शिक्षण (२०१३)
- एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (२०१४)
- नवे शिक्षण, नवे शिक्षक (२०१६)
- निराळं जग, निराळी माणसं (२०१३)
- महाराष्ट्रातील बालकल्याण : दशा आणि दिशा (२०१४)
- वंचित विकास : जग आणि आपण (२०१४)
- शब्द सोन्याचा पिंपळ (२०१३)
कविता संग्रह
संपादन- सरल्या ॠतूचं वास्तव (२०१३)
चरित्रे
संपादन- कोल्हापूरचे स्वातंत्र्योतर समाजसेवक (२०१३)
- प्रेरक चरित्रे (२०१३)
- भाषण संग्रह आकाश संवाद (२०१३)
- वि.स.खांडेकर चरित्र (२०१२)
संपादन
संपादन- वि.स. खांडेकरांच्या समग्र अप्रकाशित व असंकलित साहित्याचे संपादन
कादंबऱ्या
संपादन- नवी स्त्री (२००१)
कथासंग्रह
संपादन- दुःखहरण (२०१३)
- भाऊबीज (२००३)
- विकसन (२००२)
- सरत्या सरी (२००३)
- स्वप्न आणि सत्य (२००२)
रूपककथा संग्रह
संपादन- क्षितिजस्पर्श (२००२)
लघुनिबंधसंग्रह
संपादन- अजुनि येतो वास फुलांना (२००३)
- मुखवटे (२००४)
- रानफुले (२००२)
- सांजसावल्या (२००४)
वैचारिक लेखसंग्रह
संपादन- अज्ञाताच्या महाद्वारात (२००४)
- दुसरे प्रॉमिथियस : महात्मा गांधी (२००४)
- वन्हि तो चेतवावा (२००४)
आत्मकथनात्मक
संपादन- पहिली पावलं (२००७)
- सशाचे सिंहावलोकन (२००७)
मुलाखत संग्रह
संपादन- ॠतू न्याहाळणारं पान (२००८)
पटकथा संग्रह
संपादन- अंतरीचा दिवा (२०१२)
व्यक्तिचित्रणे
संपादन- साहित्यशिल्पी (२०१५)
- समाजशिल्पी (२०१५)
- जीवनशिल्पी (२०१५)
अन्य संपादने
संपादन- प्रगतीशील लेखक संघ - भूमिका (२००३)
- माणुसकीचा मळा - वामनदादा कर्डक (२००४)
- काव्यसावित्री (२००५)
- कॉ. गोविंद पानसरे अमृत महोत्सवी गौरविका (२०१०)
मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपद
संपादन- मराठी साहित्य संमेलन, सांबरा (कर्नाटक) - २००६.
- सीमाभाग साहित्य संमेलन, बेळगुंदी (कर्नाटक)- २००७.
- ग्रामीण मराठी युवा साहित्य संमेलन, चिंचवड - २००९.
- राधानगरी तालुका ग्रामीण साहित्य संमेलन, कपिलेश्वर, जि.कोल्हापूर - २०१०.
- मराठी साहित्य संमेलन, कारदगा (कर्नाटक)-२०१०.
- शब्दवेध साहित्य संमेलन, सांगली - २०१४.
- बालकुमार साहित्य संमेलन, करंबळी, ता. गडहिंग्लज - २०१४.
- चैतन्य शब्दांगण साहित्य संमेलन, मिरज - २०१४.
- मराठी साहित्य संमेलन, आरग (कर्नाटक)-२०१६.
- मराठी साहित्य संमेलन, मजले, ता.हातकणंगले जि. कोल्हापूर - २०१७.
- ग्रामीण साहित्य संमेलन, सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर - २०१३.
- सहयाद्री साहित्य संमेलन, तिसंगी, ता. गगनबावड, जि. कोल्हापूर - २०१५.
- दीनबंधु दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलन, शिरोळ, जि.कोल्हापूर - २०१५.
- ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, आरग, ता. मिरज, जि. सांगली
- प्रादेशिक साहित्य संमेलन, बिंबल,गोवा (२०१७)
- निमशिरगाव परिसर साहित्यिक संघ, साहित्यसुधा मंच आणि निमशिरगाव ग्रामस्थांच्या वतीने प्रतिवर्षी घेतले जाणारे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ६ जानेवारी २०१९ रोजी निमशिरगाव येथे झाले. हे संमेलनाचे २२वे वर्ष असून, संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे होते.
- सुनीलकुमार लवटे हे शब्दगंध साहित्य मंचाने शिरोळ येथे १ फेब्रुवारी २०१५ रोजी भरवलेल्या दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
पुरस्कार
संपादन- महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका अपारंपारिक साहित्य पुरस्कार रु. २५,०००/-, स्मृतीचिन्ह. (२००७)
- महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट साहित्य निर्मितीबद्दल श्रीमती लक्ष्मीबाई टिळक विशेष पुरस्कार रु. १०,०००/- गौरवचिन्ह व प्रशस्तिपत्र (२००७).
- अनुवाद पुरस्कार वि.स. खांडेकर की श्रेष्ठ कहानियाँ’च्या अनुवादाप्रीत्यर्थ भारत सरकारच्या केंद्रीय हिंदी निदेशालयाचा हिंदीतर भाषी हिंदी लेखक पुरस्कार (१९८३)
- समीक्षा पुरस्कार 'शेवडे : व्यक्तित्व एवं कृतित्व’ ग्रंथास मौलिक लेखनाबदद्ल भारत सरकारच्या केंद्रीय हिंदी निदेशालयाचा हिंदीतर भाषी हिंदी लेखक पुरस्कार (१९८६)
- राष्ट्रभाषा प्रचार/प्रसार पुरस्कार राष्ट्रीय हिंदी व्यापक प्रचार, प्रसार, लेखन, अनुवाद, संघटन इ. कार्याची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे अनंत गोपाळ शेवडे विशेष पुरस्कार रु.५०,०००/- रोख व गौरव पत्र प्रदान (२००२-२००३)
- हिंदी संशोधन, लेखन, संपादन, भाषांतर, प्रचार, प्रसार कार्याची नोंद घेऊन सन २०१४ साठी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी तर्फे अखिल भारतीय महाराष्ट्र भारती जीवन गौरव (रु. एक लक्ष, सन्मानपत्र व गौरवचिन्ह) (२०१७)
समाजकार्य पुरस्कार
संपादनअनाथ, निराधार मुले, महिलांच्या संगोपन, शिक्षण सुसंस्कार व पुनर्वसन कार्याची नोंद घेऊन वेळोवेळी अनेक पुरस्काराने गौरव, पैकी काही महत्त्वाचे :
- नॅशनल कौन्सिल फॉर रूरल हायर एज्युकेशन, भारत सरकार, नवी दिल्ली तर्फे 'रोल ऑफ ऑनर’ (१९७१)
- रोटरी इंटरनॅशनलतर्फे ’व्होकेशनल अॅवॉर्ड’ (१९९३)
- अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे रचनात्मक कार्य पुरस्कार, औरंगाबाद (१९९३)
- पॅको पवार अॅवॉर्ड, कोल्हापूर (१९९३)
- वसुंधरा कृतज्ञता पुरस्कार, पुणे (२००१)
- कोल्हापूरभूषण (२००१)
- राजर्षी शाहू सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, सोलापूर (२००६)
- भाई माधवराव बागल पुरस्कार, कोल्हापूर (२०१०)
- राज्यस्तरीय लोकशिक्षक पुरस्कार, रत्नागिरी (२०१०)
- कर्मवीर मामासाहेब जगदाळे सामाजिक कार्य पुरस्कार, बार्शी (२०१२)
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार, नाशिक (२०१७)