श्रुतसोम

(सुतसोम या पानावरून पुनर्निर्देशित)

श्रुतसोम तथा सुतसोम हा इंद्रप्रस्थाचा महापराक्रमी भीम व राणी द्रौपदी यांचा पुत्र होता.

श्रुतसोम आपल्या वडिलांप्रमाणे गदायुद्धात व काका अर्जुनासमान धनुर्विद्येत पारंगत होता.

कुरुक्षेत्राच्या युद्धात श्रुतसोमाने पहिल्याच दिवशी कौरव विकर्णाशी झुंज दिली. युद्धाच्या १२व्या दिवशी श्रुतसोमाने द्रोणाचार्यांच्या मदतीस धावणाऱ्या विविस्मतीला रोखून धरले आणि चौदाव्या दिवशी श्रुतसोमाने आपल्या सावत्र भाऊ प्रतिविंध्यासह अश्वत्थामाचे आक्रमण थोपवून धरले परंतु द्रौणीच्या प्रतिहल्ल्यासमोर माघार घेतली.[] पुढच्या दिवशी श्रुतसोम आणि त्याच्या काही सावत्र भावांनी युधिष्ठिरासह दुःशासनाशी झुंज घेतली.

युद्धाच्या शेवटच्या रात्री दुर्योधनाच्या मृत्यूनंतर अश्वत्थामाने कृतवर्मा आणि कृपाचार्य यांच्यासह पांडवांवर निर्वाणीचा हल्ला चढवला. अंधारात झालेल्या या लढाईत आपल्या चार सावत्र भावांसह श्रुतसोम मृत्यू पावला.

  1. ^ "The Mahabharata, Book 7: Drona Parva: Ghatotkacha-badha Parva: Section CLXVIII".