कृपाचार्य हे महाभारतातील हस्तिनापूर राज्याचे कुलगुरू होते. त्यामुळे ते कौरव-पांडवांचे आद्य गुरू होते. नंतरचे गुरू द्रोणाचार्य. कृपाचार्यांच्या मृत्यूचा उल्लेख कोणत्याही ग्रंथात न आल्याने त्यांना चिरंजीव (अमर) समजले जाते.