गणितानुसार, सीमा[१][२] किंवा मर्यादा[२] (इंग्लिश: Limit, लिमिट) म्हणजे एखाद्या राशीचे मूल्य वाढवत नेले असता, त्या राशीच्या एखाद्या फलाने किंवा श्रेणीने "गाठलेले" टोकाचे मूल्य होय. कलन या गणिताच्या शाखेत सीमा पायाभूत घटक असून सातत्य, विकलन, संकलन इत्यादी महत्त्वाच्या संकल्पनांच्या व्याख्या यांच्यावरच आधारल्या आहेत.

सूत्रे लिहिताना, सीमा lim या रोमन लघुरूपाने दर्शवल्या जातात. उदा.: lim(an) = a. एखाद्या राशीने किंवा श्रेणीने सीमा गाठल्याचे दर्शवण्यासाठी उजव्या बाणाचे चिन्ह (→) वापरतात. उदा.: ana.

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ गणितशास्त्र परिभाषा कोश. p. १६२.
  2. ^ a b वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा. p. १६५.