मार्कुस तुल्लियस सिसेरो (लॅटिन: Marcus Tullius Cicero; प्राचीन ग्रीक: Κικέρων Kikerōn; ३ जानेवारी इ.स.पू. १०६ – ७ डिसेंबर इ.स.पू. ४३) हा एक रोमन तत्त्वज्ञ, राजकारणी, वक्ता व वकील होता. सिसेरो प्राचीन रोममधील सर्वश्रेष्ठ वक्त्यांपैकी एक मानला जातो. त्याचा लॅटिनचा गाढ अभ्यास होता. सिसेरोच्या विचारांने संपूर्ण युरोपाच्या संस्कृती व साहित्याची घडण होण्यास मदत झाली. जॉन लॉक, डेव्हिड ह्युम इत्यादी अनेक मध्य युगीन तत्त्वज्ञांवर सिसेरोच्या विचारांचा मोठा पगडा जाणवतो. १४व्या शतकामधील इटालियन तत्त्वज्ञ पेत्रार्क ह्याने सिसेरोची काही जुनी पत्रे शोधुन काढली. ह्या घटनेमुळे रानिसांला चालना मिळाली असे मानण्यात येते.

रोमच्या एका संग्रहालयातील सिसेरोचा पुतळा

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: