मुख्य मेनू उघडा
सियाचीन हिमनगचे उपग्रहीय चित्र

सियाचीन हिमनदी हे भारताच्या हद्दीतील सर्वात उत्तरेचे टोक आहे. या हिमनदीची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची २२,००० फूट आहे. ह्या हिमनदीचा जगातील सर्वात मोठ्या हिमनद्यांत समावेश होतो. सियाचीन हिमनदीवर पाकिस्ताननेही हक्क सांगितला आहे. त्यामुळे भारताने येथे कायमस्वरूपी चौकी स्थापन केली आहे. येथे भारताच्या व पाकिस्तानच्या लष्करांच्या नेहमी चकमकी होत असतात. सियाचीन हिमनदीवर अतिशय टोकाचे थंड हवामान असल्याने बरेचसे सैनिक तसल्या गोठवणार्‍या हवामानामुळे मृत्युमुखी पडतात.

सियाचीन हिमनदी ही काराकोरम पर्वत रांगेमध्ये आहे. हिची एकूण लांबी ७० किमी इतकी असून ती काराकोरम पर्वतरांगांमधील सर्वात लांब हिमनदी आहे व अध्रुवीय हिमनद्यांमध्ये लांबीमध्ये दुसर्‍या क्रमांकाची हिमनदी आहे.35°30′N 77°00′E / 35.5°N 77.0°E / 35.5; 77.0. (सर्वात लांब अध्रुवीय हिमनदी ताजिकिस्तानची फेडचेंको हिमनदी आहे. तिची लांबी ७७ किमी इतकी आहे.) भारताने जवळपास ह्या हिमनदीच्या व मुख्य हिमनदीला मिळणार्‍या सर्व उपहिमनद्यांवर नियंत्रण प्रस्थापित केले आहे.

नावाची व्युत्पत्तीसंपादन करा

 
जम्मू काश्मीरच्या नकाशात सियाचीनचे स्थान

सियाचीन हिमनदीमध्ये अतिशय टोकाचे हवामान असले तरी सियाचीन या शब्दाचा अर्थ होतो की जंगली फुलांची जागा. कदाचित या नदीखोर्‍याच्या कमी उंचीच्या भागात आढळणार्‍या फुलांमुळे हे नाव पडले असावे.

नद्यासंपादन करा

सियाचीनचे वितळणारे पाणी हे नुब्रा नदीला मिळते ही नदी पुढे श्योक नदीला मिळते. ती सिंधू नदीची एक प्रमुख उपनदी आहे. म्हणून सियाचीन हिमनदी सिंधू नदीसाठी एक महत्त्वाची उपनदी आहे. जागतिक तापमानवाढी चे परिणाम ह्या हिमनदीवरही दिसत असून हिमनदी वितळण्याचे प्रमाण वाढले आहे तसेच मोसमी पावसाने वितळण्यास हातभार लागत आहे. असे मानले जाते की हिमनदीचा आकार गेल्या २० वर्षात ३५ टक्यांनी घटला आहे. १९८४ नंतरचे सातत्याचे युद्धही हिमनदीचे सौंदर्य बिघडवण्यास जवाबदार असल्याचे मानले जाते. [१]

सियाचीनवरील पुस्तकेसंपादन करा

  • ओळख सियाचेनची - जगातील सर्वात जास्त उंचीवरील युद्धभूमी (लेखिका - अनुराधा गोरे)
  • सियाचीन अंतहीन संघर्ष (हिंदी, लेखक - लेफ्टनंट जनरल व्ही.आर. राघवन)

बाह्य दुवेसंपादन करा

संदर्भसंपादन करा