सिन्नर
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
सिन्नर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याचे गाव आहे.
येथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात आली आहे. हे नाशिक शहराचे एक उपनगर म्हणून उदयास येईल अशी चिन्हे आहेत. मात्र गावात पाण्याचा प्रश्न उग्र आहे.
सिन्नर येथे नगरपालिका असून हे गाव चोहोबाजूंनी भिंती बांधून सीमित केले होते. हे शहर गवळी राजा राजगोविंद याने १२व्या शतकात वसविले आहे.
येथील गोंदेश्वर व ऐश्वर्येश्वर ही मंदिरे प्राचीन आहेंत.तसेच जवळच देवपुर गावात प्रसिद्ध राणेखान वाडा आहे आणि संत बाबा भागवत महाराज संजीवन समाधी आहे. या मंदिराची व्यवस्था ह.भ.प रामायणाचार्य प्रसाद महाराज भागवत आणि ह.भ.प.धर्माचार्य दिगंबर महाराज भागवत हे पाहतात (इ.स. २०१६ साली)