सिंदुर खेला ही बंगाल मधील दुर्गापूजा उत्सवातील सांस्कृतिक संकल्पना आणि आचार आहे.[] विजयादशमी अर्थात दसरा या सांगतेच्या दिवशी बंगीय महिला याचा आनंद घेतात.[]

सिंदुर खेला

माता पार्वती आपले पुत्र गणपती आणि कार्तिकेय तसेच सरस्वती आणि लक्ष्मी यांच्यासह आपल्या माहेरी चार दिवस निवसाला येते आणि यानिमित्ताने चार दिवस तिचे विशेष आदरातिथ्य केले जाते. विजयादशमीला भावपूर्णेतेने तिला निरोप देताना महिला सिंदुराने होळी खेळतात. एकमेकींना सिन्दुर लावतात.[]

स्वरूप

संपादन
 
देवीला सिन्दुर अर्पण करताना महिला

बंगाली विवाहित महिला देवीच्या विसर्जन पूजेनंतर देवीच्या कपाळावर आणि पायांवर सिन्दुर अर्पण करतात आणि देवीला गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करतात. यानंतर त्या एकमेकींच्या केसाच्या भांगात सिन्दुर भरतात आणि गालावर सिन्दुर लावतात. या आनंदी खेळाला सिंदुर खेला असे म्हणले जाते.[] या खेळासाठी बंगाली महिला लाल काठ असलेली संपूर्ण पांढऱ्या रंगाची वैशिष्ट्यपूर्ण साडी परिधान करतात अणाई पारंपरिक अलंकार धारण करतात.

  1. ^ "Sindoor Khela 2023: Celebrating Durga Puja - History, Rituals And Wishes To Share With Loved Ones". Zee News (इंग्रजी भाषेत). 2023-10-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Durga Puja 2023: आज मनाया जाएगा सिंदूर खेला,जानिए क्या है इसका इतिहास". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2023-10-30 रोजी पाहिले.
  3. ^ "Durga Puja 2023: When is Sindur Khela and how is it celebrated? Know history, rituals, and significance". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-10-23. 2023-10-30 रोजी पाहिले.
  4. ^ "Women to pay 'sindur khela' today". 2010-10-17. ISSN 0971-8257.