सिंगोरी
सिंगोरी ( कुमाऊँनी: सिङ्गौड़ी) किंवा सिंगौरी ही उत्तराखंडच्या कुमाऊँ या प्रदेशातील एक भारतीय मिठाई आहे. हा पदार्थ खव्याने बनवून मालूच्या पानात गुंडाळला जातो. सिंगोरी ही कलकंदसारखीच असते.[१][२]
काही इतिहासकारांच्या मते सिंगोरीचा उगम अल्मोडा या जुना प्रांतामध्ये असल्याचे मानले जाते.[३] सिंगोरी ही पारंपारिकपणे माळूच्या पानांसह शंकूच्या स्वरूपात खवा गुंडाळून बनवली जाते. खव्यापासून मिष्टान्न तयार केले जाते आणि मोलूच्या पानात शंकूसारखे गुंडाळून सर्व्ह केले जाते. सिंगोरी/सिंगोडी ही एक शंकूच्या आकाराची मिठाई आहे जी केवळ भारतातील कुमाऊं भागात उपलब्ध आहे.[४]
संदर्भ
संपादन- ^ "देश के कोने-कोने तक पहुंची उत्तराखंड की ये खास मिठाई, राजा-महाराजाओं को थी बेहद पसंद, अब ऑनलाइन आ रही डिमांड". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2022-05-25 रोजी पाहिले.
- ^ एजेंसी, संवाद न्यूझ. "उत्तराखंडः 'सिंगोरी' का स्वाद देशवासियों की जुबान पर चढ़ा, ऑनलाइन डिमांड पर पहुंच रहा दिल्ली- मुंबई". Prabhat Khabar (हिंदी भाषेत). 2022-05-25 रोजी पाहिले.
- ^ Shivanisingh (2016-10-11). "Know how to make singori sweet recipe - India TV Hindi News". www.indiatv.in (हिंदी भाषेत). 2022-05-25 रोजी पाहिले.
- ^ Sah, Nirmal K.; Bhatt, Shanker D.; Pande, Ravindra K. (1990). Himalaya, Environment, Resources & Development (इंग्रजी भाषेत). Shree Almora Book Depot. ISBN 978-81-900086-1-7.