सावन कुमार टाक
सावन कुमार टाक (९ ऑगस्ट १९३६ - २५ ऑगस्ट २०२२) हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि गीतकार होते. साजन बिना सुहागन, सौतन, सौतन की बेटी, सनम बेवफा, बेवफा से वफा या यशस्वी चित्रपटांसह त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. संजीव कुमार आणि मेहमूद ज्युनियर सारख्या अभिनेत्यांना चित्रपटसृष्टीत पदार्पण देण्याचे श्रेय त्यांना जाते.[१] राजेश खन्ना अभिनीत सौतन (१९८३) हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध दिग्दर्शकीय उपक्रम होता, जो मॉरिशसमध्ये चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट होता. ह्यातील "शायद मेरी शादी" आणि "जिंदगी प्यार का गीत है" ह्यासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले होते.[२]
Indian film director, producer, and lyricist | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | सावन कुमार टाक | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | ऑगस्ट ९, इ.स. १९३६ जयपूर | ||
मृत्यू तारीख | ऑगस्ट २५, इ.स. २०२२ मुंबई | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
कार्य कालावधी (अंत) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
| |||
त्यांचा विवाह संगीतकार उषा खन्ना यांच्या सोबत झाला होता; पण नंतर ते वेगळे झाले.[३]
फिल्मोग्राफी
संपादन- दिग्दर्शक म्हणून
- १९७२ - गोमती के किनारे
- १९७४ - हवस
- १९७७ - अब क्या होगा
- १९७८ - साजन बिना सुहागन
- १९८३ - सौतन
- १९८४ - लैला
- १९८७ - प्यार की जीत
- १९८९ - सौतेन की बेटी
- १९९१ - सनम बेवफा
- १९९७ - सलमा पे दिल आ गया
- २००३ - दिल परदेसी हो गया
- २००६ - सावन
- गीतकार म्हणून
- २००० - कहो ना... प्यार है - "प्यार की कष्टी में", "जनेमन जानेमन", "चांद सितारे"
संदर्भ
संपादन- ^ Anuj Kumar (17 May 2012). "My first break: Saawan Kumar Tak". The Hindu. 2 October 2012 रोजी पाहिले.
- ^ "Director Saawan Kumar Tak dies at 86". ThePrint (इंग्रजी भाषेत). PTI. 2022-08-25. 2022-08-26 रोजी पाहिले.
- ^ Rana A. Siddiqui (7 August 2003). "At home with melody". The Hindu. 16 October 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 October 2014 रोजी पाहिले.