साल्व्हादोर आयेंदे
साल्व्हादोर ग्विलेर्मो आयेंदे गोसेन्स (स्पॅनिश: Salvador Guillermo Allende Gossens; २६ जून १९०८ - ११ सप्टेंबर १९७३) हा चिले देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. १९७० साली आयेंदे लोकशाही मार्गाने निवडून आलेला मार्क्सवादी विचारांचा लॅटिन अमेरिकेमधील पहिला राष्ट्राध्यक्ष बनला. चिलेच्या राजकारणामध्ये सुमारे ४० वर्षे कार्यरत राहिलेला आयेंदे चिले कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य होता व चिलेयन सेनेट व मंत्रीमंडळामध्ये त्याने अनेक पदे भुषवली होती. १९५२, १९५८ व १९६२ सालच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये पराभूत झालेला आयेंदे १९७० सालच्या चुरशीच्या ठरलेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये अध्यक्षपदावर निवडून आला.
साल्व्हादोर आयेंदे | |
चिलेचा २९वा राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ ४ नोव्हेंबर १९७० – ११ सप्टेंबर १९७३ | |
मागील | एदुआर्दो फ्रेई मोंताल्व्हा |
---|---|
पुढील | ऑगुस्तो पिनोचे |
जन्म | २६ जून, १९०८ सान्तियागो, चिले |
मृत्यु | ११ सप्टेंबर, १९७३ (वय ६५) सान्तियागो, चिले |
धर्म | अज्ञेयवाद |
सही | |
संकेतस्थळ | संकेतस्थळ |
चिलेमध्ये समाजवाद रुजवण्याचे ध्येय ठेवून आयेंदेने अनेक उद्योगांचे राष्ट्रीयीकरण, सामुहिक शेती इत्यादी धोरणे अवलंबण्यास सुरुवात केली. परंतु चिले सरकारच्या इतर शाखांसोबत त्याच्या वाढत्या संघर्षांमुळे चिले संसदेने त्याचे अनेक निर्णय अवैध ठरवले व त्याला सत्तेवरून हटण्याचे आवाहन केले. ११ सप्टेंबर १९७३ रोजी चिले लष्कराचे सैनिक अध्यक्षीय प्रासादाबाहेर पोचले. एका भाषणामध्ये सत्ता सोडण्यास नकार दिल्यानंतर ह्याच दिवशी अत्यंत संशयास्पद परिस्थितीमध्ये आयेंदेचा मृत्यू झाला. लष्करप्रमुख ऑगुस्तो पिनोचेने चिलेची सत्ता बळकावली व १९७३ ते १९९० दरम्यान देशावर हुकुमत गाजवली. २०११ साली हाती घेण्यात आलेल्या एका तपासामध्ये आयेंदेने आत्महत्त्या केल्याचे निष्पन्न झाले.
जगप्रसिद्ध कवी व साम्यवादी चळवळीचा पुरस्कर्ता पाब्लो नेरुदा आयेंदेचा सल्लागार होता. सोव्हिएत संघाचा युरी आंद्रोपोव्ह, क्युबाचा फिदेल कास्त्रो इत्यादी जगातील इतर कम्युनिस्ट नेत्यांसोबत आयेंदेचे जवळीकीचे संबंध होते.
बाह्य दुवे
संपादन- साल्व्हादोर आयेंदे फाउंडेशन (स्पॅनिश मजकूर)