सार्वजनिक दृश्यमान (विधी आणि न्यायव्यवहार)
सार्वजनिक, सार्वजनिक उपलब्ध, सार्वजनिक अधिक्षेत्र इत्यादी संकल्पनांची 'सार्वजनिक दृश्यमान' या सोबत गल्लत होताना दिसते, कायद्याच्या चष्म्यातून पाहताना यातील प्रत्येक गोष्ट वेगवेगळी आहे. कायद्यांच्या दृष्टीकोणातून सार्वजनिकरित्या दृष्टीस पडलेली अथवा दृष्टीस पडणारी प्रत्येक गोष्ट सार्वजनिक असेल, सार्वजनिकरीत्या उपलब्ध असेल, सार्वजनिक अधिक्षेत्रात असेल असे नाही.
सार्वजनिक म्हणजे सर्वांना माहित झालेले अथवा असलेले, सर्वांच्या मालकीचे, सर्वांना वापरता येण्या जोगे अथवा सरकारी मालकीचे म्हणून सार्वजनिक मालकीचे या पैकी कोणताही एक अर्थ असू शकतो.
'सार्वजनिक दृश्यमान' असलेली गोष्ट सार्वजनिक नसून 'खासगी' असू शकते, खासगी गोष्टीना 'सार्वजनिक दृश्यमानता' असली तरी त्यास सार्वजनिक उपलब्धता म्हणजे वापरण्याचा अधिकार नसेल अथवा मर्यादीत असू शकेल. किंवा सार्वजनिक, सार्वजनिक उपलब्ध, सार्वजनिक अधिक्षेत्र या पैकी एक किंवा अधिक मधीलही अशू शकेल.
सार्वजनिक उपलब्ध मध्ये सर्वसाधारणत: एखादी गोष्ट सार्वजनिक मालकीची असो अथवा नसो, सर्वसाधारणपणे ठराविक अटींवर जसे कि मुल्य देऊन अथवा मोफत, कायद्यांच्या अधीन राहून त्या अटींमध्ये बसणाऱ्या कुणासही 'सार्वजनिकरीत्या उपलब्ध' गोष्ट वापरता यावयास हवी. परंतु 'सार्वजनिकरीत्या उपलब्ध' या संकल्पनेची 'सार्वजनिक दृश्यमान' संकल्पनेशी गल्लत केली जाताना दिसते कि ज्यामुळे वापरास अनुमती नसलेल्या गोष्टीचा (अनधिकृत) वापर होताना दिसून येऊ शकतो. सार्वजनिक अधिक्षेत्र या शब्दातील सार्वजनिक शब्दात सरकारी मालकी हा अर्थ नसेल तर अशी गोष्ट (कायद्यांच्या अधीन राहून) सर्वांना वापरण्यास मुक्तपणे उपलब्ध असते. म्हणजेच 'सार्वजनिक उपलब्ध' मध्ये तीन प्रकार असू शकतात, पहिला सार्वजनिक अधिक्षेत्रातील मुक्तपणे वापरास अनुमती असलेला, दुसरा विशिष्ट अटींवर सार्वजनिक वापरास अनुमती असलेला, तिसरा अनधिकृत म्हणजे 'सार्वजनिक दृश्यमान' या संकल्पनेशी गल्लत झाल्यामुळे वापरास अनुमती नसतानाही वापरला जात असणारा.[१]
उपरोक्त विश्लेषण विविध कायद्यांच्या दृष्टीने विचारात घेता येऊ शकते जसे की कॉपीराईट कायदा.
विविध कायद्यांतर्गत संबंधीत कलमे
संपादनन्यायालयीन निकालांचे दाखला अभ्यास
संपादन- उत्तरदायकत्वास नकार लागू
क्रमांक | केस शक्यतो ऑनलाईन दुव्यासहीत | माननीय उच्च अथवा सर्वोच्च न्यायालय | वर्ष | कायदा आणि कलम (आणि उपलब्ध असल्यास दाखला मजकुर |
(दाखला अभ्यास विश्लेषण असल्यास केवळ उचित संदर्भासहीत) |
---|---|---|---|---|---|
उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | |
उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | |
उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | |
उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | |
उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | |
उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | |
उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | |
उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण | उदाहरण |