साचा:कृतपा
कृपया स्वत:ची व्यक्तिगत मते टाळा,संदर्भ नमुद करा,सर्वात महत्वाचे 'तटस्थता पाळा'.पाळावयाचे लेखनसंकेत
विकिपिडिया एक ज्ञानकोश आहे, एखादी सर्वसाधारण वेबसाईट नव्हे. विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून निष्पक्ष आणि तटस्थ असणे अभिप्रेत आहे.तटस्थ दृष्टीकोन हे एक मुलभूत विकिमीडिया तत्व आणि विकिपीडियाचा आधारस्तंभ आहे. सर्व विकिपीडिया लेख आणि इतर विश्वकोशीय मजकुर तटस्थ दृष्टीकोनातूनच लिहिला गेला पाहिजे , आणि शक्यतोवर पुर्वग्रहांशिवाय, विश्वासार्ह स्रोतातून प्रकाशित झालेले सर्व महत्वपूर्ण दृष्टीकोन संदर्भासहीत उचित प्रतिनिधित्व झाले पाहिजे. याच्याशी तडजोड नाही आणि सर्व लेखात, आणि सर्व लेख संपादकांकडून हे अपेक्षित आहे. तटस्थ दृष्टीकोनाचा अवलंब लेखात व्हावा याकरिता मार्गदर्शनासाठी संदर्भांना प्राधान्य देण्यबद्दल सजग रहावे. |
मराठी विकिपीडियाचा वाचक आणि संपादक वर्ग वैविध्यपूर्ण आहे त्यांच्या तेवढ्याच विविध अपेक्षा असतात आणि काही जणांना विकिपीडियाची पूर्ण माहिती असते ,काहींना काहीच पूर्व कल्पना नसते तर काही वेळा आपण गृहीत धरतो त्यापेक्षा स्वरूप वेगळे असते.त्या करिता खालील गोष्टींची नोंद घ्या.
- विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा. मराठी विकिपीडियावर आपण नवीन सदस्य असल्यास सामाजीक/राजकीय विवाद्द विषयातील विवादात, मर्यादीत संदर्भस्रोत/अभ्यासावर आधारीत सहभाग टाळा. विकिपीडियावर अभ्यस्त होण्यास स्वत:स पुरेसा कालावधी द्या. अविवाद्द विषयांवरही लेखन आणि चर्चा वाचन आणि सहभाग घ्या.
- व्यक्तिगत पुर्वग्रहांची निर्मिती शालेय/बालवय ते वयस्क कोणत्याही काळात झालेली असू शकते.शालेय/बालवयात बऱ्याचदा केवळ आदर्श बाजूंचाच परिचय करून दिला जातो.प्रगल्भ अथवा कटू सत्य उल्लेखांची माहिती अजाणवयात उपलब्ध करून देण्याचे टाळले गेलेले असू शकते.विकिपीडिया विश्वकोश आहे.विश्वकोशांना स्वतःचा विशीष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षीप्त(मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्याच्या सह) शक्य तीथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती वाचत असतो.
- (इथे वाचकांना रूक्षता अपेक्षीत नसते, पण निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टीकोण: आम्ही मोजक्या Facts आणि statistics सह वाचतो.आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशीष्ट संदर्भासहीत सांगा, पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका असा असतो.)
- विकिपीडिया माहितीचे प्रतिबंधन करत नाही.
- आपल्या स्वत:च्या दृष्टीकोनांसोबतच विरूद्ध दृष्टीकोनांचे सुद्धा वाचन करून त्यातील दर्जेदार लेखनाचे संदर्भ निष्पक्षपणे कसे समाविष्ट करता येतील ते पहा. प्रौढवयात विवीध कारणांमुळे ग्रंथालयांचा संपर्क तुटला असण्याची , किंवा विषय आवडीचे/वेळ नसल्यामुळे अथवा आपल्या अभिप्रेत दृष्टीकोनांचे समर्थन नसल्यामुळे आपल्याकडून संबंधीत विषयातील वाचन टळलेले असू शकते.
- इंग्रजी भाषेतही ग्रंथातील माहितीचा मोठा भाग इंटरनेटवर वाचण्यास कॉपीराईट आणि इतर अनेक कारणांनी अद्याप उपलब्ध झालेला नाही.मराठी सारख्या भाषांची स्थिती याबाबत अत्यंत दयनीय आहे. इंटरनेटवर अगदीच थोड्या फार उपलब्ध माहितीवरच पुर्वग्रह घडण्याची शक्यता असते अल्प माहिती आधारीत एकांगी दृष्टीकोनांचा अट्टाहास टाळून सहकार्य करा.
- शक्य झाल्यास प्राध्यापक,विषय तज्ञ , ग्रंथपाल , ग्रंथालयांचे वाचक आणि जाणकारांना विकिपीडियावर सहभागी होण्यास प्रोत्साहीत करा.
- बऱ्याच दृष्टीकोनात अगदी आपल्या स्वत:च्याही आणि आपल्या दृष्टीकोनांच्या विरूद्ध दृष्टीकोन मांडणाऱ्यातही,निष्कर्ष-घाई, निष्कर्ष उणीवा, तर्कदोषांमुळे ( logical fallacy) तार्किक उणीवा असू शकतात.तर्कशास्त्र logic आणि तर्कदोष logical fallacy या विषयांवर मराठीत माहितीची लेखनाची उपलब्धता आणि सजगतेचा मोठाच अभाव आहे. तर्कशास्त्र आणि logical fallacy विषयाचा अभ्यास करून मराठी विकिपीडियावर तर्कशास्त्र आणि तर्कदोष याबद्दल अधिक माहिती आणि सजगता निर्मितीस प्राधान्य देऊन सहकार्य करा.
- चर्चापानावरील चर्चातून /विवादातून व्यक्तिलक्ष्य तर्कदोष मोठ्या प्रमाणावर आढळून येतात त्याबाबत सजगता निर्मितीस सहाय्य करा.
- आभिमान आणि अहंकार यातील फरक ध्यानात घ्या.लेखनात अंहकार अथवा विरूद्ध दृष्टीकोणांची व्यक्तींची जाणीवपुर्वक अवहेलनेचा उद्देश दोन्हीही टाळा.
- प्रचालकांनी मराठी अथवा महाराष्ट्रातील सध्या सोशिओ पॉलिटीकली संवेदनशील मजकुरातील विवादात प्रोअॅक्टीव्ह अॅक्शन घेण्याचे/वाद विवादात सहभागी होण्याचे सहसा टाळावे. सहसा चर्चा आणि वाद विचवादांची जबाबदारी प्रचालकेतर सदस्यांनाच सांभाळू द्यावी आणि पुरेशी चर्चा आणि सहमती नंतर सुयोग्य निर्णयाची माहिती द्यावी.
मराठी विकिपीडिया मध्यवर्ती चर्चा पानावर म्हणजेच चावडीवर आपले स्वागत आहे. चर्चा पानांवर चर्चेचे प्रस्ताव अथवा चर्चेत सहभागी होण्यापूर्वी खालील चर्चा संकेतांची माहिती घ्यावी.मागील चर्चा शोधता आणि संदर्भ शोधता येतात.जुन्या चर्चांचा शोध घेऊन नेहमी विचारले जाणारे प्रश्न पाने सहाय्य पाने व सहाय्य पानांच्या आधारे ऑनलाईन पॉवर पॉईंट प्रेझंटेशन बनवण्यात सदस्यांनी वेळोवेळी पुढाकार घ्यावा.खालील सूचनांचे वाचन झाल्या नंतर सुयोग्य चर्चा पान निवडावे.
विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे.विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे.इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत,भाषिक,प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असे लेखन वगळले जाते.असा मजकूर आढळल्यास तो काढून टाकण्यात येते.
- विकिपीडिया समाज कसा आहे.
विकिपीडियाचे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व त्यांच्या विरोधी मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल असाधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत रहातात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य संदर्भ उद्धृत करून देतात. विचार जुळले नाहीत तर
- संपादनास संघर्षाचे स्वरूप न देता, दर २४ तासात एकापेक्षा अधिक वेळा आधीची आवृत्ती बदलण्याचे टाळतात
- फक्त चर्चापानावर चर्चा करतात. येथील संपादन व्यक्तिगत विश्वासार्हतेने होणे अपेक्षित असते. त्यासाठी इतरांबद्दल विश्वास दाखवणे देखील अपेक्षित असते. आपला मुद्दा पटवण्याकरिता
- विकिपीडियास संत्रस्त न करता, सभ्यपणे विकिपीडियातील उपलब्ध मार्गांची योग्य माहिती व शोध करून घेऊनच मार्ग काढणे व आपले वेगळे मत नोंदवणे अपेक्षित असते.
वृत्ती सतत सर्वांना साभाळून नेणारी, मनमोकळी व स्वागतेच्छू ठेवावी ही अपेक्षा आहे.
- विकिपीडिया समाज काय नाही.
- आचार अथवा विचारांची युद्धभूमी नाही. कोणतेही मतभेद कमी करण्याकरिता विशिष्ट पद्धती अवलंबणे अपेक्षित आहे. विकिपीडियाचा उपयोग विकिपीडियास किंवा कोणत्याही वापरकर्त्यास कोणत्याही प्रकारची त्रास/ धमकी देण्यासाठी होणे अपेक्षित नाही.
- विकिपीडिया अनियंत्रित नाही. येथे बहुसंख्य निर्णय चर्चा करून एकमताने घेतले जातात.
- विकिपीडिया राजकीय किंवा लोकशाहीचा प्रयोग नाही. निर्णय परस्पर विचारविमय करून होतात. सहमती चर्चेद्वारे घडवले जाते पण बहुमत असणे ही आवश्यक बाब नाही.
- विकिपीडिया हा नियम बनवण्याचा चाकोरीबद्ध कार्यक्रम नाही. नियमांचा उपयोग केला जातो पण त्यांना घट्ट कवटाळून बसणेही अपेक्षित नाही.