साखरी नाटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील जैतापूर खाडी किनारी वसलेले मासेमारी साठी प्रसिद्ध असे राजापूर तालुक्यातील सर्वात मोठा गाव आहे.

  ?साखरी नाटे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर राजापूर,रत्नागिरी
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
लोकसंख्या +४,००० (२०२१)
भाषा कोकणी, मराठी, हिंदी
सरपंच श्रीमती. गुलजार शफी ठाकूर
बोलीभाषा कोकणी दालदी
कोड
आरटीओ कोड

• एमएच/०८

भौगोलिक स्थान संपादन

हवामान संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन संपादन

साखरी नाटे गावातील जनता सर्वस्वी मासेमारी या व्यवसायावर अवलंबून आहे. मासेमारी. या व्यवसायामुळे स्थानिकांबरोबरच शेकडो परप्रांतीय व नेपाळी यांना रोजगार मिळतो. पुरुष मासेमारी, जाळी विणणे अथवा मच्छी खरेदी विक्री करतात तर स्त्रिया मच्छी सुकवणे व इतर गावात जाऊन मच्छी विकणे असे मासेमारीवर अवलंबून काम करतात. येथे शेती केली जात नाही.

प्रेक्षणीय स्थळे संपादन

जैतापूर खाडी, दुंगेरी जेटी (मच्छीमारी बंदर), घेरा यशवंतगड किल्ला, साखरीनाटे गावापासून ३किमी च्या अंतरावर मुसाकाझी हे ऐतहासिक बंदर,मुसाकाझी जेटी व समुद्र किनारे (sunset point) जवळच १० किमीच्या अंतरावर आंबोळगड व आंबोळगड चे २ सुंदर समुद्र किनारे आहेत.

नागरी सुविधा संपादन

जवळपासची गावे संपादन

आंबोळगड, धाऊलवल्ली, धारतळे, जैतापूर, जुवे, तुळसुंदे.

संदर्भ संपादन

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/