साकूर
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
साकूर नावाची गावे :
१. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात, २. संगमनेर तालुक्यात आहेत, ३. नाशिक जिल्ह्य़ातील ईगतपुरी तालुक्यात.
संगमनेर तालुक्यातील साकूर या गावात बिरोबा महाराजाचे जागृत देवस्थान आहे. या गावच्या बारा वाड्या आहेत. साकूरमधील कौठे मलकापूर येथे एक नवीन सहकारी साखर कारखाना होत आहे.
संगमनेर जिल्हा झाला तर साकूर तालुका होईल.
साकुर हे एक ऐतिहासिक गाव.अनेक जाती धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात.पूर्वी ब्राम्हण समाज खूप होता पण समाज व्यवस्था बदलली. रोजगार कमी झाला .या समाजाने पुणे-मुंबईला स्थलांतर केले.
गावाचे नैऋत्य दिशेला एक मोठा विस्तीर्ण जीर्ण अपूर्ण वाडा.ब्राम्हण जहागीरदाराचा हा वाडा होता. नानासाहेब कुलकर्णी त्याचे नाव .पेशव्यांचे हे जहागिरदार(वतनदार) होय.असे सांगितले जाते की,वाडा बांधण्यासाठी घेतला तेव्हा साक्षात बिरोबाने त्याच्या स्वप्नात येऊन सांगितले,की तू माझ्या उजव्या बाजूला वाडा बांधून नकोस डाव्या बाजूला बांध, अन्यथा अनर्थ होईल बांधकाम पूर्णत्वास जाणार नाही.वंश खंडण होईल .पण जहागिरदाराने ऐकले नाही.बांधकाम चालू ठेवले. तेव्हा जहागिरदार व कुटुंबातील सदस्यांचे अकाली निधन झाले.वंशखंडण झाले .वारस राहिला नाही.यामागे खरे -खोटे, श्रद्धा -अंधश्रद्धा काहीही असो पण जहागिरदार संपला तो संपलाच.हे मात्र तितकेच सत्य.
गावाचा ऐतिहासिक सबंध थेट इंदूरच्या होळकर राज घराण्याशी. होळकर राजे वर्षातून काही दिवस साकुरला येऊन राहत असत.
याविषयी जाणकार सागतात .एकदा घडले असे कि, साकुरचा बिरोबा हे प्रसिद्ध देवस्थान .साकूर पंचक्रोशीतील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर जेथे-जेथे मराठी बांधव आहे तेथे-तेथे त्याची कीर्ती पसरली होती.पूर्वी आणि आजही आहे. असे सांगितले जाते की, होळकरांच्या घोड्याला एकदा सर्पदंश झाला. बरेच दिवस झाले विष उतरेना. तेव्हा बिरोबाचा भगत (खिल्लारी )असेच इंदूरला होळकर दरबारात भ्रमंती करत गेला होता. त्याने ते बघितले .त्याने अंगारा घोड्याला लावला.तेव्हा या होळकरांच्या घोड्याचे विष बिरोबाचा अंगारा लावताच उतरले.यामागे श्रद्धा-अधश्रद्धा ,खरे -खोटे काहीही असो ,पण तेव्हापासून होळकरांचे विश्वास देवावर बसला.आणि त्यांचे साकूरच्या बिरोबाच्या दर्शनासाठी येणे सुरू झाले.त्यानिमित्ताने अनेक दिवस श्रीमंत होळकरांचा मुक्का साकूरला होत असे.मुक्कामी राहण्याची सोय व्हावी म्हणून जुन्या पेठात एक टोलेजंग वाडा बांधला होता.तो होळकरवाडा नावाने ओळखला जात असे.
तेव्हापासून साकुरची कीर्ती सर्व महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर जेथे-जेथे मराठी बांधव आहे तेथें-तेथे झाली.असा ऐतिहासिक वारसा उराशी बाळगून असलेले हे गाव.
गावाच्या पश्चिम दिशेला उत्तर-दक्षिण धुपेश्वर ओढा आहे. या ओढ्याचे पाणी खूप खुप गोड आहे आणि होते .कितीही दुष्काळ पडला तरी अव्याहतपणे हा ओढा वाहत असायचं.गावाची तहान भागवणाऱ्या या ओढ्याचे पाणी साखरेसारखे गोड म्हणून गावाला साकूर हे नाव मिळाले.साखरे सारखे गोड. 'साखर 'चा अपभ्रंश होऊन साकूर झाले.आणि येथील हे गोड पाणी रेड्याच्या पखालीतून थेट होळकरांना पिण्यासाठी जात असे.काही दिवसांपूर्वी बिरोबाचे जुने मंदिर पाडुन नवे बांधले आहे. हे जुने मंदिर होळकरांनीच बांधले होते.बांधकाम हेमाडपंथी मंदिर शैली सदृश्य होते.
साकूर गावाला पूर्वी एक तटबंदी होती .सहा वेशी होत्या. तीन शिल्लक होत्या अजुनही, पण त्या पैकी सध्या एक शिल्लक आहे.
सध्या साकूर गावचे वैशिष्ट्य म्हणजे नगर जिल्ह्यातील सोनई नंतर सर्वात मोठी ग्रामपंचायत.जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव खेमनर या साकूर गावचे भूषण.१५ वर्ष संगमनेर साखर कारखान्याचे चेरमन. संगमनेर दुध संघ १५ वर्ष चेरमन होते.येणारा मुसाफिर गांव पाहून रमून जातो.जड अंतःकरणाने निरोप घेतो.गांवाचा .साकूरचा.
लोकसंख्या
संपादनसाकुर या गावचि लोकसंख्या ८९७४ असुन याची विभागणी ४५६६ पुरुष व ४४०८ स्त्रिया अशी आहे.