साईनपोस्ट

साई चरित्र

साईनपोस्ट[१] हे राजेश्वरी सुंदर राजन यांनी संपादित केलेले पुस्तक अनेक संकलित शोधनिबंधांतून तयार झालेले आहे. १९९९ मध्ये, काली फॉर विमेनकडून हे शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.

प्रस्तावना संपादन

या पुस्तकामध्ये समावेशित असणाऱ्या शोधनिबंधांवर स्वातंत्र्योत्तर भारताच्या ५० वर्षाच्या काळातील घडामोडींच्या खाणाखुणा असलेल्या जाणवतात.

स्वातंत्र्योत्तर काळात नव्याने राष्ट्र-राज्य म्हणून उदयाला येत असलेल्या भारताने आर्थिक विकास, सामाजिक बदल यासारखी ध्येये व कार्यक्रम राबवण्याच्या दिशेने वाटचाल केली असे मांडले जात असले, तरी या मागे भिन्न वास्तव दडलेले आहे, असे या पुस्तकात म्हटले आहे. वसाहतोत्तर काळात 'लिंगभाव' हा मुद्दा राष्ट्राची संस्कृती व राजकारण यामध्ये केंद्रस्थानी राहिलेला दिसून येतो. राष्ट्रउभारणीच्या प्रक्रियेमध्ये 'लिंगभाव' या संकल्पनेकडे कसे बघितले गेले, राष्ट्र आणि लिंगभाव या दोहोंतील संबंध, धूसरता आणि ताणतणाव हे या शोध निबंधांतून पुढे आलेले आहेत.

ठळक मुद्दे संपादन

भारतीय स्वातंत्र्याच्या ५० वर्षांच्या काळात लिंगभाव नावाची गोष्ट ही राष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांमध्ये नेहमीच कशी अडचण ठरली याची मांडणी हे शोधनिबंध करतात. या पुस्तकात स्त्री अस्मिता, व्यक्तिनिष्ठता आणि ऐतिहासिक आधुनिकतेबद्दलच्या कथांतील कर्तेपण यांच्या चिकित्सेतून लिंगभाव व कुटुंब, समाज, राष्ट्र यांतील ताणतणावांची मांडणी झालेली दिसत आहे.

सुमती रामस्वामी यांचे ‘’virgin mother,beloved other’ ’व अरविंद राजगोपाल ‘’thinking about the new Indian middle class: gender,advertising and politics in an age of globalization’’ हे शोधनिबंध लिंगभाव आणि राष्ट्र या दोहोंकडे जहाल पुनर्दृष्टिकोनातून बघतात. राष्ट्रवादी विचारसरणीमध्ये, वासना आणि देशभक्ती या दोहोंचे अस्तित्व आहे. पुरुष राष्ट्रभक्त आपल्या राष्ट्राकडे सुंदर, शुद्ध व हवीशी वाटणारी परंतु माता या नात्याची स्त्री म्हणून बघतात.

अरविंद राजगोपाल आपल्या शोधनिबंधामध्ये वसाहत्तोतर राष्ट्रामधील, जागतिकीकरणाच्या संस्कृतीचे आकलन करण्याचा प्रयत्‍न करतात. टेलिव्हिजनच्या माध्यमातून सार्वजनिक व खाजगी जागांचे संकल्पीकरण झाले, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याशिवाय टेलिव्हिजनने उच्च जात वर्गीयांच्या इच्छांचे प्रतिरोपण नवउदारमतवादी अर्थव्यवस्थेच्या संदर्भात केलेले आहे. राजगोपाल या शोधनिबंधामध्ये टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध व यशस्वी ठरलेल्या जाहिरातींचे परीक्षण करतात. जागतिकीकरण संस्कृती आणि खुली अर्थव्यवस्था या दोन गोष्टी एकत्र कश्या आणते हे यातून पुढे येते.gender development and women's movement या शोधनिबंधामध्ये 'स्त्रिया आणि विकास' या विकासाच्या दृष्टिकोनाचे परीक्षण करण्यात आलेले आहे. विकास या प्रक्रियेमध्ये स्त्रियांना केंद्रस्थानी आणताना, स्त्रियांचा विकास हा स्त्री- पुरुष दोघांचा मुद्दा म्हणून न बघता, तसेच हा सामाजिक व्यवस्थेचा मुद्दा म्हणून न बघता त्यामध्ये केवळ स्त्रियांबद्दलच बोलले गेले. नटराजन, तरु आणि अनुपमा राव यांच्या शोधनिबंधांतून भारतातील स्त्रीवादी साहित्यामध्ये, जातीविषयीच्या मानववंशशास्त्राच्या पारंपारिक विश्लेषणापासून फारकत घेत संस्कृती, कायदा आणि आधुनिकता या क्षेत्रांमध्ये जातीची चर्चा व्हायला कशी सुरुवात झाली हे दिसते.

प्रतिसाद संपादन

वसंत कन्नबिरन, (Indian review of books)यांच्या मते, या पुस्तकातील भेदक असे हे शोधनिबंध आपल्या लिंगभाव, जात, नागरिक आणि राष्ट्र याच्या गुंतागुंतीच्या व त्रासदायक प्रश्नांबद्दलच्या आकलनामध्ये भर घालणारे ठरतात. या पुस्तकाच्या विस्तृत आणि व्यापक अश्या प्रस्तावनेमुळे हे पुस्तक वाचनयोग्य ठरते.[२]

महत्त्वाच्या संकल्पना संपादन

लिंगभाव, जागतिकीकरण, नवउदारमतवाद

संदर्भ सूची संपादन

  1. ^ Sunder Rajan Rajeshwari,Signpost,kali for women,New Delhi,1999.
  2. ^ ISBN 0-8135-2912-3