सरासरी धावा हे क्रिकेटच्या खेळातील फलंदाजाच्या(बॅट्समन) प्रभावीपणाचे एक मानक आहे.

एखाद्या बॅट्समनच्या सरासरी धावा मोजण्यासाठी खालील समीकरण वापरले जाते.

येथे

  • Avg = सरासरी धावा.
  • Runs = बॅट्समनने काढलेल्या एकूण धावा.
  • Completed Innings = या धावा काढण्यासाठी बॅट्समनने खेळलेल्या पूर्ण खेळ्या.
  • पूर्ण खेळी = अशी खेळी ज्यात बॅट्समन बाद झाला/झाली होता/ती. जर एखाद्या खेळीत फलंदाज बाद झाला नाही तर त्या खेळीस पूर्ण खेळी धरत नाहीत.

उदा. जून २७, इ.स. २००६ रोजी राहुल द्रविड १०३ कसोटी सामन्यात १७४ खेळ्या खेळला होता. त्यात त्याने ८,९०० धावा काढल्या. १७४ पैकी २२ वेळा राहूल द्रवीड नाबाद होता.

या परिस्थितीत द्रविडच्या सरासरी धावा अशा मोजता येतील.

म्हणजेच द्रविडच्या सरासरी धावा आहेत ५८.५५ प्रती खेळी.