ज्याँ-बेडेल बोकासा
(सम्राट बोकासा पहिला या पानावरून पुनर्निर्देशित)
ज्यॉॅं-बेडेल बोकासा (फेब्रुवारी २२, इ.स. १९२१ - नोव्हेंबर ३, इ.स. १९९६) हा मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष, हुकुमशहा व सम्राट होता.
जानेवारी १, इ.स. १९६६ रोजी बोकासा सैन्याच्या मदतीने सत्तेवर आला व त्याने स्वतःला राष्ट्राध्यक्ष करून घेतले. डिसेंबर ४, इ.स. १९७६ रोजी त्याने स्वतःला बोकासा पहिला (अथवा पहिला बोकासा) या नावाने मध्य आफ्रिकेचा सम्राट घोषित केले. सप्टेंबर २०, इ.स. १९७९ रोजी त्याची सत्तेवरून हकालपट्टी झाली. याला सलाह एद्दिन अहमद बोकासा या नावानेही ओळखतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |