सप्तधान्यांकुर अर्क
सप्तधान्यांकुर अर्क म्हणजे सात धान्यांच्या अंकुरांचा अर्क. हा अर्क सेंद्रिय शेतीमध्ये पिकांसाठी टॉनिक म्हणून वापरला जाते.
सप्तधान्यांकुर अर्क तयार करण्याची कृती
संपादनसप्तधान्यांकुर अर्क तयार करताना त्यात तीळ, मूग, उडीद, चवळी, मटकी, देशी हरभरा, गहू ही सात धान्ये प्रत्येकी १०० ग्रॅम भिजवून त्यांना मोड आणले जातात. मोड आल्यावर ती एकत्र वाटली जातात. मोडांचे वाटण + २०० लिटर पाणी + १० लिटर देशी गाईचे गोमूत्र + कडधान्य भिजवलेले पाणी काडीने ढवळून गोणपाटाने झाकून ठेवले जातात. हे मिश्रण ४ तास तसेच ठेवले जाते आणि नंतर ढवळून गाळले जाते. त्यानंतर पिकावर फवारले जाते.
हे द्रावण पिकांसाठी तसेच फळबागांसाठी पोषक तत्त्वांनी युक्त टॉनिक आहे.