अजय सिंग तथा सनी देओल (१९ ऑक्टोबर १९५६) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते असून १७व्या लोकसभेचे सदस्य देखील आहेत.

सनी देओल
सनी देओल
जन्म अजय सिंग देओल
१९ ऑक्टोबर, १९५६ (1956-10-19) (वय: ६७)
पंजाब, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९८३ - सद्य
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट गदर एक प्रेम कथा, दामिनी, बोर्डर
वडील धर्मेंद्रसिंग देओल
आई प्रकाश कौर
अपत्ये करण देओल,
राजवीर देओल
धर्म शिख

सनी देओल यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. त्यांचा पहिला चित्रपट ‘बेताब' हा १९८३ मध्ये प्रदर्शित झाला होता. २०१६ मध्ये त्यांचा *घायल: वन्स अगेंन* हा चित्रपट रिलीज झाला होता.त्या चित्रपटाची कथा त्यांनी स्वतःच लिहिली होती._ सनी देओल यांचे ‘बॉर्डर' व ‘गदर' हे चित्रपट खूप प्रसिद्ध ठरले.तसेच त्यांचे डायलॉग आजही लोकांना पाठ आहेत._

धरम प्राजी'का पंजाबी पुत्‍तर म्‍हणून बॉलीवूडमध्‍ये सहज एन्‍ट्री मिळविलेल्‍या सनी देवोलने स्‍वबळावर सिनेसृष्‍टीत आपले स्‍थान पक्‍के केले आहे. गेल्‍या 25 वर्षात विविध भूमिकांमधून दमदार अभिनय करून सनीने आपला स्‍वतःचा असा खास प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. त्‍याच्‍या स्‍टील मॅन इमेजमुळे चित्रपट एक हाती तारून नेण्‍याची त्‍याच्‍यात क्षमता आहे. त्‍याचे घायल, बॉर्डर, गदर, इंडियन हे चित्रपट त्‍या-त्‍या काळातील प्रेक्षकांना वेड लावून गेले. एक्‍शन हिरो इमेजमध्‍ये अडकून पडलेल्‍या सनीने नंतरच्‍या काळात कॉमेडीपटातूनही भाग्‍य आजमावून पाहण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यात मात्र त्‍याला हवे तसे यश मिळाले नाही.

संदर्भ

संपादन