दर्शन जोशी
स्वागत
संपादनमराठी विकिपीडिया वर स्वागत आहे! न्युटनच्या नियमांमध्ये जे काही बदल तु केलेत त्यात मी काही सुधारणा केल्या आहेत. पुढेही असेच संपादन चालु ठेव.
स्नेहल शेकटकर (चर्चा) २०:३०, ९ जुलै २०१४ (IST)
न्यूटनचे नियम
संपादनसंपादन केल्याबद्दल धन्यवाद. मी तुझ्या लिहीण्यातील काही चुका दुरूस्त केल्या आहेत. कण वस्तुमान या शब्दाविषयी काही विवेचन गरजेचे वाटते. Point mass या इंग्रजीमधील शब्दाचे जसेच्या तसे भाषांतर न करता आपल्याला या शब्दाचा काय अर्थ अभिप्रेत आहे हे पाहाणे महत्वाचे ठरते. न्यूटनचे नियम लागु करताना ती वस्तु जणु काही गणितीय बिंदु आहे अशी आपण कल्पना करतो. या बिंदुला वस्तुमान असते हे अगोदरच आपण मान्य केलेले आहे त्यामुळे वस्तुमान या शब्दाचा पुन्हा उल्लेख करणे गरजेचे वाटत नाही. त्यामुळे मी Point mass या शब्दाऐवजी बिंदुस्वरूप असा साधा शब्द वापरला आहे. अर्थात याबाबत अजुन चर्चा होणे गरजेचे आहे आणि आपण चर्चा करूनच याबाबतचा अंतिम निर्णय करूयात.