ब्रिस्टॉल प्रिन्स.

नमस्कार मित्रांनो,मी ब्रिस्टॉल प्रिन्स,

मी एक प्रयोगशिल उद्योगपती,गायक व अभिनेता आहे.

मला प्रामुख्याने संगित,राजकारण,समाजकारण,लेखन,कला,उद्योग, आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान,चित्रपट या विषयात रस आहे.या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून माझी क्रियाशिलता वाढवणे मला आवडते.

माझे जीवनाचे तत्वज्ञान

संपादन

मी आधुनिक विचारसरणी तसेच वैज्ञानिक नैतिक मूल्य जपणारा आहे.

सर्व क्षेत्रात चांगले कार्य करून आपले जीवन सार्थ करावे हि माझी इच्छा आहे.त्याच बरोबर जीवनाचा समर्पक उपभोग घेणे मला आवडते.ज्ञान व कौशल्य,मग ते कुठल्याहि क्षेत्रातले असो, आपल्यात असणे आवश्यक आहे कारण तीच आपली मनुष्य जीवनाची ओळख आहे.आपले विचार व नैतिक मूल्य तर उच्च असावितच पण त्याचबरोबर आपले राहणीमान सुद्धा शक्य तेवढे उच्च असावे हि मा़झी विचार धारणा‌ आहे.योग्य प्रमाणात भौतिक सुख उपभोगणे आवश्यक असते नाहितर जंगलातल्या प्राण्यांमधे व आपल्यात फरक तो काय?फक्त दोन वेळ जेवण करून पोट भरणे हे मानवी जन्माचे ध्येय असू शकत नाही.

आपल्या मनुष्य जन्माचे काहितरी ध्येय असणे व त्यासाठी धडपडत राहणे हेच मनुष्याच्या जीवनाची गाडी पळत ठेवत असते.प्राणी व मनुष्य यात हाच मुख्य फरक आहे.

ज्ञान,विज्ञान,तंत्रज्ञान व तत्वज्ञान हे मानवाने निर्माण केलेले आहेत,या गोष्टी म्हणजे अखंड ब्रम्हांडाला मानव जातीने दिलेली हि सगळ्यात मोठी देणगी आहे.त्याचा उपयोग आपण आपले जीवन सुखकर व सोपे करण्यासाठी केला पाहिजे.ज्ञानाचा उपयोग वैचारिक व नैतिक मूल्य उच्च करण्यासाठी केला पाहिजे.

थोडक्यात आपले जीवन म्हणजे नितीमत्ता, कर्त्तृत्व,तत्त्व, वैयक्तिक जबाबदार्या व भौतिक सुख यांचा सुंदर संगम असावा.

माझी एकात्मतेची संकल्पना

संपादन

माझी मानवी जीवनाची संकल्पना जागतिक एकात्मता या आधारावर आहे.धर्म,जात,वंश, मातृभाषा वर्ण या भेदभाव निर्माण करणार्या गोष्टी मी मानत नाही.माझ्या दृष्टीने सर्व मनुष्य मूलत: समान आहेत.नंतर प्रत्येकाची नितीमत्ता व जीवन मूल्ये व त्याची जीवनातील कामगिरी,कर्म या आधारावर त्याचे स्थान व दर्जा ठरवला जाऊ शकतो.

मी कुठल्याहि धर्माचे समर्थन करते नाहि कारण मुळात धर्म,जात या गोष्टी मनुष्या मनुष्यात भेदभाव करण्यासाठिच बनवली गेली आहे.व सर्व धर्म आपल्याला एकाच संकल्पनेवर आधारित जीवन जगायला शिकवतात ती म्हणजे ईश्वर.आपले जीवन सुखी होण्यासाठी ईश्वराची मनधरणी करावी हे सर्व धर्मांचे एक सामाईक तत्त्व आहे.

पण माझ्या दृष्टिने लाचार होउन ईश्वरावर अवलंबुन राहण्या पेक्षा स्वत:च्या कर्त्तृत्वाने आपले जीवन यशस्वी करणे योग्य आहे.

माझे छंद

संपादन

मला आयुष्य बिनधास्त व मुक्तपणे जगायला आवडते. निसर्गाचा आस्वाद घेत फिरणे,हॉर्स राइडिंग,बाईक व कार्स,फॅशन,प्राचीन वास्तुंच्या कलाकृतींचे निरिक्षण,विविध संस्कृति मधील वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे.

मी मार्शल आर्ट,चायनिज ध्यान पद्धती ची कुंग, भारतीय प्राणायाम व योग यांचा सराव करतो.

मी विकिपीडिया मधे आलो व लिखाण करायला सुरवात केली कारण मला ज्ञान व चांगले विचार, माहिती वगैरे मिळवायला व ते दुसर्यां सोबत शेअर करणे आवडते.