शैली सिंह
संपादनशैली सिंह (जन्म: ७ जानेवारी २००४, झांसी,उत्तर प्रदेश )ही लांब उडीच्या स्पर्धांमध्ये भाग घेणारी एक तरुण भारतीय अॅथलीट आहे,
ती भारताची ज्युनियर राष्ट्रीय लाँग जंप चॅम्पियन असून, १८ वर्षाखालील गटात जगातील अव्वल २० लाँग जंपर्समध्ये तिचा क्रमांक लागतो.
वैयक्तिक माहिती | |
---|---|
Nationality | इंडियन |
जन्म |
७ जानेवारी २००४ झांसी |
[1] १८ वर्षांखालील गटात लांब उडीचा राष्ट्रीय विक्रम तिच्या नावे आहे.
तिला भारताच्या अनुभवी लाँग जंपर अंजू बॉबी जॉर्ज आणि त्यांचे पती तसेच पुरस्कृत प्रशिक्षक रॉबर्ट बॉबी जॉर्ज प्रशिक्षण देत आहेत. [4]
वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी
शैली सिंहचा जन्म ७ जानेवारी २००४ रोजी उत्तर प्रदेशच्या झांसी येथे झाला. तिचे पालनपोषण आई विनिता सिंह यांनीच केले, ज्या तीन मुलांच्या एकल माता आहेत.
शिवणकाम करणाऱ्या विनिता सिंह यांना शैलीने अॅथलेटिक्समध्ये करियर करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा धक्काच बसला.
छोट्या शहरातील एका गरीब कुटुंबातील मुलीने लांब उडीसारख्या खेळात करियर घडवण्याचा विचार करणे सोपे नव्हते. [1]
मात्र, लाँग जंपमधील शैलीच्या उल्लेखनीय कौशल्याने रॉबर्ट बॉबी जॉर्ज यांचे लक्ष वेधून घेतले. ते भारताची माजी लाँग जंपर अंजू बॉबी जॉर्ज यांचे पती आणि एक विख्यात प्रशिक्षक आहेत. त्यांनीच मग शैलीला बेंगळुरूमधील अंजू बॉबी जॉर्ज स्पोर्ट्स फाऊंडेशनमध्ये प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली. [1]
अंजु बॉबी जॉर्ज स्पोर्ट्स फाऊंडेशनमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी शैली वयाच्या १४व्या वर्षी बेंगळुरूला गेली. [2] शैलीने जॉर्ज दाम्पत्याच्या देखरेखीत प्रशिक्षण सुरू केले.
व्यावसायिक कारकीर्द
शैली सिंहने २०१८ मध्ये रांची येथे झालेल्या राष्ट्रीय कनिष्ठ अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये १८ वर्षाखालील गटात लाँग जंपमध्ये सुवर्ण पदक जिंकले. यात तिने ५.९४ मीटरची उडी नोंदवत कनिष्ठ लाँग जंपमधला राष्ट्रीय विक्रमही मोडला. २०१८ मध्ये तिने आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे राष्ट्रीय कनिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धेत ६.१५ मीटर उडी मारत स्वतःचाच विक्रम मोडला, आणि १८ वर्षांखालील गटामध्ये सुवर्ण पदक जिंकले. ही उडी २०२०च्या आयएएफ स्पर्धेत भाग घेण्यासाठीच्या पात्रता उडीपेक्षा बरीच लांब होती. [5] भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री किरन रिजिजू यांनी तिच्या यशाबद्दल अभिनंदन करणारा एक संदेश ट्वीट केला होता. [6]
तिचे प्रशिक्षक रॉबर्ट बॉबी जॉर्ज आणि अंजू बॉबी जॉर्ज यांचा असा विश्वास आहे की शैली आपल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर येत्या काही वर्षांत भारतीय ट्रॅक आणि फील्ड खेळांमध्ये वर्चस्व गाजवेल, तसंच भारतासाठी २०२४च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकही जिंकून आणू शकेल. [2]
अंजू बॉबी जॉर्ज फाउंडेशन शिवाय शैली सिंहला ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट आणि बेंगळुरूमधील अभिनव बिंद्रा सेंटरचाही पाठिंबा आहे. [...]
Right hand box
पूर्ण नाव: शैली सिंह
जन्म: ७ जानेवारी २००४
जन्म स्थानः झांसी, उत्तर प्रदेश
खेळ: लांब उडी
प्रतिनिधी: भारत
पदके
नॅशनल ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप रांची २०१८ मध्ये १६ वर्षाखालील लाँग जंप प्रकारात सुवर्ण पदक
नॅशनल ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप गुंटूर (ए.पी) २०१९मध्ये १८ वर्षाखालील प्रकारात सुवर्ण पदक
संदर्भ
- https://www.indiatimes.com/sports/long-jumper-shaili-singh-just-broke-the-national-under-16-and-under-18-records-she-could-be-the-next-big-thing-in-indian-athletics-379289.html
2. https://www.shethepeople.tv/news/athletics-long-jumper-shaili-singh-breaks-record/
3. https://www.thehindu.com/sport/other-sports/made-for-the-long-jump/article26093469.ece
4.https://www.newindianexpress.com/sport/other/2019/nov/08/coach-tips-olympics-future-for-teen-prodigy-shaili-singh-2058785.html
5. https://indianexpress.com/article/sports/shaili-singh-remember-name-long-jump-6106851/
6.https://www.business-standard.com/article/news-ani/rijiju-lauds-shaili-singh-for-scripting-national-record-119110500875_1.html
7. https://www.bbc.com/marathi/india-55720801