Sathyavani Muthu (es); Sathyavani Muthu (hu); Sathyavani Muthu (ast); Sathyavani Muthu (ca); Sathyavani Muthu (yo); Sathyavani Muthu (de); Sathyavani Muthu (ga); Sathyavani Muthu (da); Sathyavani Muthu (sl); सत्यवानी मुथु (mr); Sathyavani Muthu (sv); Sathyavani Muthu (nn); Sathyavani Muthu (nb); Sathyavani Muthu (nl); Sathyavani Muthu (fr); सत्यवनी मुथु (hi); ಸತ್ಯವಾಣಿ ಮುತ್ತು (kn); ਸਤਿਆਵਾਨੀ ਮੁਥੁ (pa); Sathyavani Muthu (en); സത്യവാണി മുത്തു (ml); ᱥᱚᱛᱭᱚᱵᱚᱱᱤ ᱢᱩᱛᱷᱩ (sat); சத்தியவாணி முத்து (ta) femme politique (fr); indisk politiker (sv); indisk politikar (nn); indisk politiker (nb); Indiaas politica (1923-1999) (nl); indisk politiker (da); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); سياسية هندية (ar); política india (1923–1999) (ast); Indian politician and an influential dalit leader (en); سیاست‌مدار هندی (fa); Indian politician and an influential dalit leader (en); India siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag)

सत्यवानी मुथू (१५ फेब्रुवारी १९२३ - ११ नोव्हेंबर १९९९) [] एक भारतीय राजकारणी आणि चेन्नई, तामिळनाडू येथील प्रभावशाली नेता होत्या. त्या तामिळनाडूच्या विधानसभेच्या सदस्या, राज्यसभेच्या सदस्या आणि केंद्रीय मंत्री होत्या. त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात द्रविड मुन्नेत्र कळग्घमच्या सदस्या म्हणून केली, स्वतःचा पक्ष ताळ्तापट्टोर मुन्नेत्र कळघम सुरू केला आणि नंतर अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघममध्ये सामील झाल्या. १९९० च्या उत्तरार्धात त्या पुन्हा द्रविड मुन्नेत्र कळघममध्ये सामील झाल्या.

सत्यवानी मुथु 
Indian politician and an influential dalit leader
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखफेब्रुवारी १५, इ.स. १९२३
मृत्यू तारीखनोव्हेंबर ११, इ.स. १९९९
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • Member of the Tamil Nadu Legislative Assembly
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

विधानसभेचे सदस्य

संपादन

१९४९ पासून द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) च्या त्या सदस्य होत्या. १९५३ मध्ये, कुल कलवी थिट्टमच्या विरोधात डीएमकेच्या निषेधाचे नेतृत्व केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. १९५९-५८ दरम्यान त्या पक्षाच्या प्रचार सचिव होत्या. त्यांनी अन्नाई (अर्थ: आई) मासिकाच्या संपादक म्हणूनही काम केले [] त्यांनी १९५७ ते १९७७ आणि १९८४ दरम्यानच्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये पेरांबूर आणि उलुंडुरपेट मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. तिने पेरांबूर मतदारसंघातून १९५७ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून, १९६७ आणि १९७१ च्या निवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कळघम उमेदवार म्हणून तीन वेळा विजय मिळवला. [] [] [] १९६२ ची निवडणूक पेरांबूरमधून आणि १९७७ ची निवडणूक उलुंदुरपेट मतदारसंघातून त्या हरल्या. [] []

तामिळनाडूचे मंत्री

संपादन

१९६७ ते १९६९ या काळात तामिळनाडूमधील सीएन अन्नादुराई प्रशासनात हरिजन कल्याण आणि माहिती मंत्री म्हणून त्यांनी काम केले. एम. करुणानिधी प्रशासनात १९७४ पर्यंत त्यांनी पुन्हा हरिजन कल्याण मंत्री म्हणून काम केले.[] []

ताळ्तापट्टोर मुन्नेत्र कळघम

संपादन

त्यांनी १९७४ मध्ये आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि द्रविड मुनेत्र कळघम सोडला. त्यांनीदावा केला की सीएन अन्नादुराई यांच्या निधनानंतर द्रमुककडून हरिजनांना चांगली वागणूक दिली जात नाही आणि नवीन नेते एम. करुणानिधी हे हरिजनांबद्दल पूर्वग्रहदूषित होते. [] त्या म्हणाली की, हरिजनांच्या हक्कासाठी लढण्यासाठी नवा पक्ष स्थापन करण्याची वेळ आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नंतर कोणीही खऱ्या हे काम केले नाही व नवा पक्ष स्थापन करू, विरोधात बसून त्या अनुसूचित जातींच्या हक्कांसाठी लढणार.[][][१०] त्यांनी ताळ्तापट्टोर मुन्नेत्र कळघमची स्थापना केली. १९७७ च्या निवडणुकीत अण्णा द्रविड मुनेत्र कळघम जिंकून सत्तेवर आल्यानंतर त्यांनी आपला पक्ष विलीन केला. [११]

केंद्रीय मंत्री

संपादन

३ एप्रिल १९७८ ते २ एप्रिल १९८४ पर्यंत त्यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम प्रतिनिधी म्हणून राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. १९ ऑगस्ट १९७९ ते २३ डिसेंबर १९७९ पर्यंत चौधरी चरण सिंह मंत्रालयात त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केले. ए. बाला पजानोर यांच्यासह त्या केंद्रीय मंत्रालयात काम करणाऱ्या तामिळनाडूतील पहिल्या दोन बिगर-काँग्रेस द्रविड पक्षाच्या राजकारणी होत्या. [१२]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b Thirunavukkarasu, Ka (1999). Dravida Iyakka Thoongal (तामिळ भाषेत). Nakkeeran pathippakam.
  2. ^ "1957 Madras State Election Results, Election Commission of India" (PDF). Election Commission of India. 1 December 2009 रोजी पाहिले.
  3. ^ "1967 Tamil Nadu Election Results, Election Commission of India" (PDF). Election Commission of India. 1 December 2009 रोजी पाहिले.
  4. ^ "1971 Tamil Nadu Election Results, Election Commission of India" (PDF). Election Commission of India. 1 December 2009 रोजी पाहिले.
  5. ^ "1962 Madras State Election Results, Election Commission of India" (PDF). Election Commission of India. 1 December 2009 रोजी पाहिले.
  6. ^ "1977 Tamil Nadu Election Results, Election Commission of India" (PDF). Election Commission of India. 1 December 2009 रोजी पाहिले.
  7. ^ India, a reference annual. Publications Division, Ministry of Information and Broadcasting. 1968. p. 447.
  8. ^ a b c Duncan Forrester (1976). "Factions and Filmstars: Tamil Nadu Politics since 1971". Asian Survey. 16 (3): 283–296. doi:10.2307/2643545. JSTOR 2643545.
  9. ^ "The rise and fall of Sathyavani Muthu". Femina. 7 June 1974.
  10. ^ The Hindu (5 May, 6 May, 15 May and 3 June 1974). Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ "Nedunchezhiyan dies of heart failure". The Hindu. 13 January 2000. रोजी मूळ पानापासून संग्रहित5 December 2010. 1 December 2009 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
  12. ^ "The Swing Parties". Indian Express. 15 May 2009. 1 December 2009 रोजी पाहिले.