सचिन गंगाधर लोकापुरे  (इंग्रजी: Sachin G Lokapure ;) (११ ऑक्टोबर, १९८६:सोलापूर, महाराष्ट्र - ) हे एक भारतीय सूक्ष्मदर्शक उपकरण शास्त्रज्ञ व औषधनिर्माण शास्त्रज्ञ आहेत.[ संदर्भ हवा ] त्यांनी शिवाजी विद्यापीठातून बीफार्म व राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ, बंगळुरु मधून एम.फार्मा पदवी घेतली. त्यानंतर लोकापुरे यांनी श्री अप्पासाहेब बिरनाळे फार्मसी महाविद्यालयात अध्यापन आणि संशोधनाचे पायाभूत काम केले. तसेच त्यांनी सॅगलो रीसर्च इंडस्ट्रीची स्थापना सूक्ष्मदर्शक उपकरण तंत्रज्ञान विकास या साठी केली.[ संदर्भ हवा ]

सचिन लोकापुरे

जन्म ऑक्टोबर ११, इ.स. १९८६
सोलापूर
निवासस्थान सांगली,महाराष्ट्र राज्य
नागरिकत्व भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र सूक्ष्मदर्शक उपकरण शास्त्र, औषधनिर्माण शास्त्र
कार्यसंस्था श्री अप्पासाहेब बिरनाळे फार्मसी महाविद्यालय, सांगली, संस्थापक,सॅगलो रीसर्च इंडस्ट्री, सांगली.
ख्याती बॅक्टेरिया मूव्हमेंट डिटेक्शन डिव्हाइस, डिजिटल मिक्रोस्कोपी अँड अडॅप्टर
वडील गंगाधर
आई राजेश्री
स्वाक्षरी [[चित्र:
Sign of sachin lokapure
|150px]]


संशोधन

संपादन

बॅक्टेरियाच्या हालचाली शोधण्याचे साधन, मायक्रोबियल इलेक्ट्रोलायझिस बॅटरी आणि डिजिटल मिक्रोस्कोपी अँड अडॅप्टर शोधणारा भारतीय शोधकर्ता आहे. २०१३ मध्ये त्यांच्या शोधासाठी त्यांना पेटंट मिळाला होता.त्यानंतर त्यांनी बॅक्टेरिया मूव्हमेंट डिटेक्शन डिव्हाइस[], लवचिक मायक्रोबायल इंधन सेल आणि डिजिटल होलोग्राफिक मायक्रो-इमेजिंग डिव्हाइसचे १००हून अधिक भारतीय युटिलिटी आणि डिझाईन पेटंट्स प्राप्त केले. त्याच्या शोधाव्यतिरिक्त, ते  संश्लेषण आणि फार्मास्युटिकल ड्रग्सच्या पॉलिमॉर्फिक फॉर्मसाठी नवीन शैली विकसित केले आहे.त्यांनी एकूण ४० शोधनिबंध लिहिले. []असून वेगवेगळली  १०० पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत.[][]

 
Flexible microbial electrolysis battery.

तसेच  त्यांनी भारतीय बौद्धिक संपदा हक्कांचे तत्व - कायदा आणि सराव यान विषयावर पुस्तक प्रकाशित केले आहे.[]

वाटचाल

संपादन

भारतात असणारे मायक्रोस्कॉपी उपकरणे ही काही प्रमाणात परदेशातून म्हणजेच जपान आणि चीनमधून मागवली जातात. आयात केलेले हे उपकरणे महागडीसुद्धा आहेत. तर याद्वारे अहवाल बनवण्याच्या काही तांत्रिक त्रुटी देखील आहेत. यामुळे लोकापुरे यांनी संशोधन करत स्वतः भारतीय बनावटीचे मायक्रोस्कॉपीची डिजिटल उपकरणे तयार केली. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी लोकापुरे यांनी संशोधनाला सुरुवात केली आणि पहिले पेटंट दखल केले होते.[] लोकापुरे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सूक्ष्म रोगनिदानात उपयोगात येणारी डिजिटल यंत्रे विकसित केली आहेत. इतकेच नव्हे तर सचिन यांनी याची नोंद सुद्धा भारतीय पेटंट कार्यालयाकडे केली आहेत. त्यामुळे त्यांच्या नावे तब्बल ७५ पेटंटची नोंद झाली आहे. सचिन लोकापुरे यांनी आतापर्यंत तब्बल १७ उत्पादनांची निर्मिती करून या सर्वांची नोंद भारतीय पेटंट कार्यालयाकडे केली आहे.[ संदर्भ हवा ]

इंडिया आणि लिमका बुक ऑफ रेकॉड मधील नोंद

संपादन

सचिन लोकापुरे यांना त्यांच्या कामाबद्दल आणि त्यांचा पेटंट्सची इंडिया बुक ऑफ रेकॉड आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्ड यांनी नोंद घेतली आहे.[]

एकाधिकार (पेटंट्स)

संपादन
  • बॅक्टेरियाच्या हालचाली शोधण्याचे मशीनसाठी भारतीय एकाधिकार (पेटंट) २९४२७४ ( ११ फेब्रुवारी, इ.स. २००९ला मागणी केली व १४ मार्च, इ.स. २०१८ रोजी भारतीय एकाधिकार (पेटंट) मिळाला.)[]
     
    Indian Patent 294274: Bacterial movement detection device: Apparatus for detection of bacterial movement and method of sample preparation. Issued March 14, 2018.
  • कॉम्पॅक्ट एल-आकाराचे डिजिटल मायक्रोस्कोपसाठी भारतीय एकाधिकार (पेटंट) २८९२९४ (२८ जानेवारी, इ.स. २००८ला मागणी केली व ०७ नोव्हेंबर, इ.स. २०१७ रोजी भारतीय एकाधिकार (पेटंट) मिळाला.)[]
 
Indian Patent 289294: Compact L-Shaped Digital Microscope. Issued November 07, 2017.

ऑरगॅनिक रेअकॅशन साठी डिफरेंशियल कंडेन्सर

संपादन
  • सचिन लोकापुरे यांनी फार्मास्युटिकल ऑरगॅनिक रेअकॅशन साठी डिफरेंशियल कंडेन्सर विकसित केले. या कंडेनसर साठी भारत सरकारने डिझाईन पेटंट दिले आहे. फार्मास्युटिकल ऑरगॅनिक रेअकॅशन डिफरेंशियल कंडेन्सरचे फायदे 1. एका वेळी तुम्ही एका या काँडेन्सॉर मधुन वेगवेगळे ऑरगॅनिक रेअकॅशन करू शकता. 2. तुम्ही तुमच्या रेअकॅशनची उत्पन्न वाढवू शकता. 3. कमी वेळेत तुम्ही ऑरगॅनिक रेअकॅशन करू शकता.[][१०]

मल्टी-फोटॉन कॉन्ट्रास्ट इल्युमिनेशन डिव्हाइस

संपादन
  • "मायक्रो फाइन स्ट्रक्चर व्हिज्युअलाइज करण्यासाठी डिजिटल ऑप्टिकल मायक्रोस्कोपसाठी मल्टी-फोटॉन कॉन्ट्रास्ट इल्युमिनेशन डिव्हाइस" शोधून काढले आहे जे सूक्ष्म संरचना सैद्धांतिक पद्धती आणि व्यावहारिक अंमलबजावणीवर आधारित आहे. आम्ही या ऑप्टिकल उपकरणासाठी युटिलिटी आणि डिझाइन पेटंट दाखल केले आणि सैद्धांतिक कामासाठी भारतात कॉपीराइट दाखल केले. हे तंत्रज्ञान डार्क फील्ड मायक्रोस्कोपीवर आधारित आहे ट्रांसमिशन वेव्हलेंथ T=530nm@3.9v, O=650nm, T=550nm@7.5v, O=650nm, E=25s+1comp, A =70/30.[११]
 
मल्टी-फोटॉन कॉन्ट्रास्ट इल्युमिनेशन डिव्हाइस

क्रोमॅटिक कॉन्ट्रास्ट एन्हांसमेंटद्वारे उच्च-रिझोल्यूशन डार्क-फील्ड नॅनोस्कोपी

संपादन
  • 660nm वर क्रोमॅटिक कॉन्ट्रास्ट एन्हांसमेंटद्वारे उच्च-रिझोल्यूशन डार्क-फील्ड नॅनोस्कोपीद्वारे विश्लेषण केलेले नॅनोपार्टिकल" साठी नवीन पद्धत विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान उच्च-रिझोल्यूशन डार्क-फील्ड नॅनो मायक्रोस्कोपीमध्ये सादर करता येते - 100nm (0.1मायक्रोमीटर) पर्यंतचे रिझोल्यूशन म्हणजे सेल नमुन्यातील प्रोटीनचे  डॉट स्पॉट आपण पाहू शकतो.या पद्धतीसाठी नोंदणीकृत भारतीय कॉपीराइट –L-121528/2023 आणि भारतीय डिझाइन पेटंट आणि युटिलिटी पेटंट प्राप्त झाले. [१२]
 
क्रोमॅटिक कॉन्ट्रास्ट एन्हांसमेंटद्वारे उच्च-रिझोल्यूशन डार्क-फील्ड नॅनोस्कोपी

संदर्भ

संपादन

"

  1. ^ Sachin, Lokapure (June 2020). "Motiloscope- A Novel Method and Device to Detect Bacterial Motility using Disk Type Sample Holder" (PDF). International Research Journal of Engineering and Technology. 07: 2265.
  2. ^ "Research Paper Publication".
  3. ^ "sachin-lokapure-gains-75-patents".
  4. ^ "sachin-lokapure-have-a-75-petant-and-his-name-is-in-limka-and-india-book-of-record".
  5. ^ Sachin, Lokapure. "PRINCIPLE OF INDIAN INTELLECTUAL PROPERTY RIGHTS - LAW AND PRACTICE". 2 नोव्हेंबर 2024 रोजी पाहिले.
  6. ^ a b "संग्रहित प्रत". 2019-10-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-10-25 रोजी पाहिले.
  7. ^ "sachin-lokapure-have-a-75-petant-and-his-name-is-in-limka-and-india-book-of-record".
  8. ^ "संग्रहित प्रत". 2019-10-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-10-25 रोजी पाहिले.
  9. ^ "सांगलीतील प्राध्यापकाने मिळवले 240 पेटंट, आता बनवला मल्टीपल कंडेनसर".
  10. ^ "सचिन लोकापुरे प्राध्यापकाची पेटंट मॅन' म्हणून ओळख".
  11. ^ "Saglo Research Equipment's – Innovation For Humanity". www.sagloresearch.com. 17 ऑगस्ट 2024 रोजी पाहिले.
  12. ^ "Saglo Research Equipment's – Innovation For Humanity". www.sagloresearch.com. 17 ऑगस्ट 2024 रोजी पाहिले.

"