सगनभाऊ जन्म १७७८ मृत्यू १८५० सगनभाऊ मुस्लिम धर्मीय होता. मूळचा जेजुरीचा राहणारा; परंतु पुढे अनेक वर्ष पुण्यात व्यवसायाच्या निमित्ताने राहिला. तो शिकलकरीचा तलवारींना धार लावणे, म्यान बनवणे, असा व्यवसाय करीत. सगनभाऊ लावण्या उत्तम लिहीत. त्या काळी गवळ्याचा फड व रावळचा फड असे दोन फड पुण्यात होते. गवळ्याच्या फडाचा प्रमुख होनाजी तर रावळाच्या फडाचा प्रमुख सगनभाऊ होता

गुरुपरंपरा

संपादन

नागेश - अदिनाथ - गोविंदनाथ - सिद्धनाथ - सगनभाऊ अशी त्यांची नाथपंथीय परंपरा आहे.

वैशिष्ट्ये

संपादन

सगनभाऊच्या लावण्यातील शृंगारात नाजुकपणा व संयम अधिक होता. एकनिष्ठा, पातिव्रत्य, धर्मश्रद्धा, याबाबतचे हिंदुसंस्कार त्यामधे स्पष्ट दिसून येतात. अनंतफंदीपासून शृंगाराला सुरुवात झाली. सगनभाऊच्या काळी रसिकतेने मर्यादा ओलांडली. बिभत्स, अश्लील, आडपडदा न ठेवता लावणीकार सर्व वर्णन करुत होते. त्याच वेळेस सगनभाऊनेही शृंगारिक लावण्या रचल्या. स्वतंत्र विचार, मनोहर कल्पना, यांची सांगड त्याने आपल्या कवनात घातलेली दिसते. उत्तान शृंगार व डौलदार रचना, बैठकीच्या चाली, यामुळे सगनभाऊच्या लावण्या लोकप्रिय झाल्या. सगनभाऊंनी आपल्या लावण्यांतून मराठी राज्य, मराठी संस्कृतीचे दर्शन घडविले.

'नाकी नथ हालति नागिन डुलती शृंगाराचा काय नखरा' किंवा 'लाल भडक वेणी सडक आति चमेली मधि भिजली' आणि 'गोरे गाल मजा पहाल जपून चाल फाकडे' असे वर्णने तो करतो.

सगनभाऊवरील पुस्तके

संपादन
  • सगनभाऊकृत लावण्या व पोवाडे (संपादित, पद्मगंधा प्रकाशन)