भारतीय संविधान दिन
संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.[१] त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.[२] भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.[३] संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.[४][५] महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.[६]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "संविधान दिन शासनादेश २४ नोव्हेंबर २००८" (PDF).
- ^ "Govt. to observe November 26 as Constitution Day". द हिन्दू. 11 October 2015. 20 November 2015 रोजी पाहिले.
- ^ "Constitution Day: ऐसे बना था भारत का संविधान, डॉ. अंबेडकर ने निभाया अहम रोल". aajtak.intoday.in.
- ^ "November 26 to be observed as Constitution Day: Facts on the Constitution of India". इंडिया टुडे. 12 October 2015. 2015-11-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 November 2015 रोजी पाहिले.
- ^ "Law Day Speech" (PDF). Supreme Court of India. 20 November 2015 रोजी पाहिले.
- ^ "संविधान दिन विशेष : शिल्पकार ठरले ई. झेड. खोब्रागडे". Lokmat. 2020-04-09 रोजी पाहिले.