संध्या पुरेचा

भरतनाट्यम नृत्यांगना

संध्या पुरेचा (डिसेंबर २९, इ.स. १९६५: मुंबई, महाराष्ट्र, भारत ) ह्या एक प्रख्यात भरतनाट्यम नृत्यांगना, परफॉर्मिंग आर्टिस्ट, नृत्यदिग्दर्शक, लेखिका आणि भारतीय शास्त्रीय नृत्याच्या संस्कृतच्या संशोधक आहेत. सध्या संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष[] तसेच वुमन-२० परिषदच्या अध्यक्ष आहेत.[] नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीमती पुरेचा यांना २०१७ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[]

संध्या पुरेचा
आयुष्य
जन्म २९ डिसेंबर १९६५
जन्म स्थान मुंबई , महाराष्ट्र, भारत
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत
गौरव
पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार

श्रीमती संध्या पुरेचा यांचा जन्म २९ डिसेंबर १९६५ रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथे झाला. संध्या पुरेचा यांनी गुरू आचार्य पार्वतीकुमार यांच्याकडे भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी भरतनाट्यममधील "नाट्यशास्त्र इन थिअरी आणि प्रॅक्टिस ऑफ अंगिकाभिनया" या विषयात डॉक्टरेट पदवी मिळवली आहे.[]

कारकीर्द

संपादन

संध्या पुरेचा यांनी अनेक कोरिओग्राफिक निर्मितीचे नृत्यदिग्दर्शन केले आहे आणि संगीत नाटक अकादमीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांसह देश-विदेशातील प्रतिष्ठित नृत्य महोत्सवांमध्ये सादरीकरण केले आहे. []व्याख्यान-प्रदर्शन आणि कार्यशाळांसाठी त्यांनी दक्षिण आफ्रिका, यूएसए, तैवान आणि यूके येथे प्रवास केला आहे. त्यांनी २००५ मध्ये भरत कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स ऍण्ड कल्चर महाविद्यालयाची स्थापना केली, जी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, नागपूरशी संलग्न आहे;[] आणि सरफोजीराजे भोसले भरतनाट्यम प्रशिक्षण आणि भरतनाट्यम फेलोशिपचे विश्वस्त आणि मानद सचिव म्हणून व्यवस्थापन करत आहेत. त्यांनी SOCH-सेव्ह अवर कल्चरल हेरिटेजची संकल्पना मांडली आहे, जी भारतीय शास्त्रीय नृत्याद्वारे भारतीय कला आणि संस्कृतीचे जतन आणि प्रसार करण्याची मोहीम आहे. अनेक परिषदांमध्ये मौलिक शोधनिबंधांचे वाचन,अनेक ग्रंथांचे संपादनही त्यांनी केले आहे. त्या मुंबईतील संशोधन केंद्र आणि कला परिचय, मुंबईच्या कलात्मक संचालक आहेत. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे, आणि त्या कनिष्ठ आणि वरिष्ठांसाठी तज्ञ समिती सदस्य, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार (२०१५-१८) यासारख्या विविध प्रतिष्ठित समित्यांच्या सदस्या आहेत.[]

पुरस्कार

संपादन

त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार (२००६), गुजरात गौरव पुरस्कार (२००७), महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार (२०१३)[] आणि हिरकणी पुरस्कार (२०१६)[] श्रीमती संध्या पुरेचा यांना नृत्यात दिलेल्या योगदानाबदल २०१७ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ "'संगीत नाटक अकादमी'वर नृत्यविदुषी!". mahamtb.com (Marathi भाषेत). 24 September 2022. 12 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "About Chair, W20 India: Dr. Sandhya Purecha". w20india.org (English भाषेत). 26 December 2022. 12 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "President of India to confer Sangeet Natak Akademi Awards (Akademi Puraskar) for the Year 2017". pib.gov.in (english भाषेत). 5 February 2019. 12 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "संध्या पुरेचा" (PDF). sangeetnatak.gov.in (english भाषेत). 12 March 2023. 12 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 12 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "अष्टनायिका : संध्या पुरेचा द्वारा भरतनाट्यम प्रस्तुति" (PDF). sahitya-akademi.gov.in (English भाषेत). 13 March 2023. 13 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 13 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "FOUNDER PRINCIPAL GURU DR. SANDHYA PURECHA". bharatcollegeofdance.org (English भाषेत). 13 March 2023. 13 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "न्यासी मण्डल". ignca.gov.in (hindi भाषेत). 12 March 2023. 12 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ "नागपुर के पंकज चांदे को कालिदास पुरस्कार". Bhaskar.com (hindi भाषेत). 12 March 2023. 12 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ "12 वा सह्याद्री हिरकणी सन्मान पुरस्कार 2016 प्रदान". pibmumbai.gov.in (english भाषेत). 26 April 2016. 12 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)