संथाळी विकिपीडिया

विकिपीडियाची संथाळी भाषेतील आवृत्ती

संथाळी विकिपीडिया ही विकिपीडियाची संथाळी भाषेतील आवृत्ती आहे, जी विकिमीडिया फाउंडेशनद्वारे चालविली जाते. ही आवृत्ती २ ऑगस्ट २०१८ रोजी आरंभ केली गेली. संथाळी भाषेची स्वतःची वर्णमाला ओल चीकी या विकिपीडियाची वर्णमाला म्हणून वापरली गेली आहे.[][] संथाळी दक्षिण आशियामध्ये (बांगलादेश, भारत, भूतान आणि नेपाळ) सुमारे ७४ लाख भाषिक असलेली ऑस्ट्रो आशियन भाषासमूहातील मुंडा उपसमूहातली एक भाषा आहे.

संथाळी विकिपीडिया
संथाळी विकिपीडियाचे प्रतिक-चिन्ह
स्क्रीनशॉट
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषा संथाळी
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवा http://sat.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण २ ऑगस्ट, इ.स. २०१८
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

इतिहास

संपादन

संथाळी भाषा विकिपीडिया तयार करण्याची प्रक्रिया सुरुवात २०१२ मध्ये झाली आणि नंतर, फेब्रुवारी २०१७ मध्ये ही प्रक्रिया गतिशील झाली.[] २०१२ मध्ये, विकिमीडिया बांगलादेशने संताली भाषा विकिपीडिया सुरू करण्याच्या उद्दीष्टाने बांगलादेशच्या दिनाजपूर जिल्ह्यात संथाळी भाषा समुदायाबरोबर विकिपीडिया बैठक व कार्यशाळेचे आयोजन केले होते.[] तथापि, काही काळानंतर ही प्रक्रिया मंदावली.[]

त्यानंतर सप्टेंबर २०१७ मध्ये, विकिमीडिया बांगलादेशने ढाका विकिपीडियाच्या बैठकीत संथाळी भाषा समुदायाबरोबर आणखी एक बैठक आयोजित केली होती जिथे विकिपीडियाच्या प्रक्षेपण त्वरेने करण्याचा निर्णय घेण्यात आला.[][] त्या चर्चेनंतर, ३० डिसेंबर २०१७ रोजी संथाळी भाषा समुदायासाठी विकिमीडिया बांगलादेशातर्फे ढाका येथे एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते [] ऑनलाईन चर्चेच्या माध्यमातून भारतातील संथाळी भाषा समुदायानेही त्या कार्यक्रमात भाग घेतला. त्यानंतर ओडिया विकिमीडियन्सवापरकर्त्यांच्या सहकार्याने ११ मार्च २०१८ रोजी भारताच्या ओडिशामध्ये संथाळी भाषिक समुदायासाठी आणखी एक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

काही महिन्यांच्या कामानंतर, विकिमीडिया भाषा समितीने २८ जून २०१८ रोजी संथाळी भाषेच्या विकिपीडियाला मान्यता दिली गेली आणि संथाळी विकिपीडिया शेवटी २ ऑगस्ट २०१८ रोजी प्रक्षेपित करण्यात आली.[][]

चित्रवीथि

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन

 

  1. ^ উইকিপিডিয়ায় সাঁওতালি ভাষা - banglatribune.com. 2019-08-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-04-06 रोजी पाहिले.
  2. ^ উইকিপিডিয়ায় সাঁওতালি ভাষা. 2018-11-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ a b Tanvi, Patel (10 August 2018). "This Tribal Language Just Became India's First to Have Wikipedia Edition in Own Script!". The Better India.
  4. ^ a b c "Santhali becomes India's first tribal language to get own Wikipedia edition". 9 August 2018.
  5. ^ ক্ষুদ্রজাতির ভাষায় বিশ্বকোষ - কালের কণ্ঠ (Bengali भाषेत).
  6. ^ a b Bhandari, Tannistha. নজির গড়ে উইকিপিডিয়ায় স্বীকৃতি পেল সাঁওতালি ভাষা. kolkata24x7.com. 2018-08-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-04-06 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन