संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान

(संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)

बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात हे लक्षात घेऊन शासनाने २०००-०१ पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली. प्रचंड लोकसहभागाने या चळवळीला लोकचळवळीचे रूप दिले, एवढेच नाही तर कोट्यवधी रुपयांची विकास कामे ही लोकसहभागातून करण्यात आली. शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी, घराची स्वच्छता आणि अन्नाची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, सांडपाण्याचे नियोजन आणि घनकचऱ्याचे व्यवस्थापन , मानवी मल-मूत्राची विल्हेवाट यासारख्या विभागात काम करून गावांनी अतिशय उत्स्फुर्तपणे ग्रामविकासाचा पाया मजबूत केला.

गावातील विद्यार्थी असो की अंगणवाडी सेविका-मदतनीस, सरपंच असो की महिला भगिनी, सर्वांनी या योजनेत भरीव योगदान तर दिलेच परंतु गावाच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासाला गती ही दिली. स्वखुषीने स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या या सर्व लोकांनी गावागावात स्वच्छतेची ग्राम-धून निर्माण केली आणि आरोग्यसंपन्न आणि सुदृढ आरोग्याचा पाया रोवला असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.v i

संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार

संपादन
  • वर्ष २०००-०१ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१५५ . रुपये (रक्कम लाखात) ७१९.२४
  • वर्ष २००१-०२ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१५६. रुपये (रक्कम लाखात) ७९७.७०
  • वर्ष २००२-०३ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१६०. रुपये (रक्कम लाखात) ९००.००
  • वर्ष २००३-०४ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१६७. रुपये (रक्कम लाखात) ९७५.००
  • वर्ष २००४-०५ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१६२. रुपये (रक्कम लाखात) ९७५.००
  • वर्ष २००५-०६ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१५९, रुपये (रक्कम लाखात) ९७५.००
  • वर्ष २००६-०७ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१७९, रुपये (रक्कम लाखात) १०००.००
  • वर्ष २००७-०८ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१७७, रुपये (रक्कम लाखात) १०९९.००
  • बक्षीस क्रमांक प्रथम, पंचायत समिती स्तर २५ हजार, जिल्हा स्तर ५ लाख, विभागीय स्तर १० लाख, राज्य स्तर २५लाख
  • बक्षीस क्रमांक द्वितीय, पंचायत समिती स्तर १५ हजार, जिल्हा स्तर ३ लाख, विभागीय स्तर ८ लाख, राज्य स्तर २०लाख
  • बक्षीस क्रमांक तृतीय, पंचायत समिती स्तर १०हजार, जिल्हा स्तर २ लाख, विभागीय स्तर ६ लाख, राज्य स्तर १५लाख

टीप : हा पुरस्कार देणे सरकारने तूर्त बंद केले आहे.

संदर्भ

संपादन

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/sant-gadgebaba-swachhta-abhiyan-suspended/articleshow/50917592.cms[permanent dead link]

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान

https://www.loksatta.com/mumbai-news/gadgebaba-gram-swachhata-abhiyan-suspended-by-state-govt-1200043/