अंगणवाडी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अंगणवाडी देशामध्ये एकूण १३.७७ लाख [१] अंगणवाडी असून राज्यात १,०८,००५ अंगणवाडी कार्यान्वित आहेत. [२] यात १२.८ लाख अंगणवाडी सेविका तर ११.६ लाख अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहेत.[३]
अंगणवाडी म्हणजे काय
संपादनग्रामीण भागांमध्ये अंगण परिसरात चालवली जाणारी माहितीकेंद्र म्हणजे अंगणवाडी. आईसीडीएस (ICDS) हा अंगणवाडी कार्यक्रम म्हणूनही ओळखला जातो, कारण स्थानिक अंगणवाडी ही आईसीडीएस (ICDS) चा आधारशिला आहे. खरं तर आईसीडीएस (ICDS) सेवा त्याच्या केंद्रांच्या विशाल नेटवर्कद्वारे पुरवल्या जातात त्याला 'अंगणवाडी' म्हणतात. नावाप्रमाणेच अंगणवाडी हे एक केंद्र आहे. अंगणवाडी केंद्र पगारदार अंगणवाडी सेविका चालवतात आणि अंगणवाडी मदतनीस त्यांना मदत करतात. अंगणवाडी केंद्रे स्थापन करण्यासाठी सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वे लोकसंख्येच्या निकषांवर आधारित आहेत. ह्यात महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला जातो. ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे तसेच माता-बालक ह्यांच्या आरोग्य, आहार, कुपोषण या अन्य बाबीं कडे लक्ष पुरवणे अश्या कार्यांचा समावेश अंगणवाडी मध्ये होतो. ह्या शिवाय पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, ग्रामीण भागातील महिलांना आहार व आरोग्य ह्या विषयी योग्य मार्गदर्शन करणे हे देखील अंगणवाडीचे मुलभूत कार्य आहे.[४]
भारतातील अंगणवाडी शिक्षणाची पार्श्वभूमी
संपादनभारतात अंगणवाडी शिक्षणाची सुरुवात १९ व्या शतकापासून झाली आहे. त्यावेळी लॉर्ड कर्झन हा भारताचा व्हाईस रॉय होता. त्याच्याच काळात किंडगार्डन पद्धती आपल्या देशात सुरू झाली. त्यामुळे त्या पद्धतीचा परिणाम आपल्या शिक्षणक्षेत्रात व विशेषतः प्राथमिक शिक्षणात आजही दिसून येते आहे.
भारतात शिशुच्या अध्यापनाची व्यवस्था १८८७ पासून करण्यात आली आहे. त्यावेळी पाच वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाच या शाळांमध्ये प्रवेश मिळत असे. परंतु चार वर्ष वयाची मुलेही शाळेत येत असत व त्यांनाही प्रवेश मिळत असे त्यामुळे चार वर्षाच्या मुलांना बालोद्यान पद्धतीने शिकवावे असा विचार करून प्राथमिक शाळेतच बालवर्गाची सुरुवात करण्यात आली होती. या वर्गात गाणी, गोष्टी, खेळ अशा कार्यक्रमांना स्थान देण्यात आले. परंतु या शाळेत प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमाच्या अनुसरून पूर्वतयारी करून घेण्याकडेच विशेष लक्ष दिले जात होते.
भारतात १८९४ साली माँटेसरी पद्धतीची पहिली शाळा मद्रासजवळ अडयारला सुरू झाली. या शिक्षणपद्धतीचा प्रसार व्हावा म्हणून भावनगरचे गिजुभाई व ताराबाई मोडक या दोघांनी बराच प्रयत्न केला आहे. मुंबई राज्यात १८९६ मध्ये माँटेसरी शाळेची स्थापना "बडोदे जिल्ह्यातील वासते" या गावी झाली. भावनगर येथे १९२५ मध्ये पहिली "माँटेसरी परिषद भरली. श्रीमती ताराबाई मोडक व श्री. गिजुभाई बधेका यांच्या संयुक्त प्रयत्नानी त्याच वर्षी नुतन बालशिक्षण संघाची स्थापना झाली.[५]
"नूतन बालशिक्षण संघ" या नावाची शिक्षण संस्था सुरू झाल्यावर या शिक्षणाचा बराच प्रसार होवून गावोगावी बालमंदिरे व शिशुसदने निघण्यास सुरुवात झाली. या शाळेमध्ये अध्यापन करणारी व पालकांनी या वयोगटातील मुलांशी कसे वागावे हे त्यांना कळावे व मुलांच्या घरगुती वातावरणातील अडचणी स्पष्ट व्हाव्यात या उद्देशाने गिजुभाईनी गुजराती भाषेत शिक्षण पत्रिका सुरू केली. ताराबाई मोडक यांनी मराठी आवृत्ती सुरू केली. त्याकाळी गिजुभाई आणि ताराबाई यांनी संपादित केलेली ८० - ९० बालवाडःमय आजही लोकप्रिय आहेत. या शिक्षणाचे काम ब-याच प्रमाणात सुरुवातीस शहरातून झाले. शिक्षणाचा प्रसार व प्रचार खेडेगावातही व्हावा म्हणून "नूतन बाल शिक्षण संघाने लक्ष दिले त्यासाठी प्रसारकार्य शिक्षण पत्रिकेद्वारे करण्यात आले होते. याबाबतीत ५ वर्षे विशेष संशोधन करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे पहिले पाऊल नुतन बालशिक्षण संघाने डिसेबर १९४५ मध्ये बोर्डी ग्रामवालशिक्षण केंद्र सुरू केले व त्या केंद्राचे नेत्वृत्व श्रीमती ताराबाई मोडक यांच्याकडे देण्यात आले.[६]
भारतात माँटेसरी पद्धतीच्या प्रचाराचे मुख्य कारण म्हणजे भावनगरला दक्षिणामूर्ती संस्थेत गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी सुरू केलेले अध्यापन मंदिरे होय. या अध्यापन मंदिरातील शिक्षण सुरुवातीला पूर्णपणे माँटेसरी पद्धतीचे नव्हते. परंतु या अध्यापन पद्धतीमुळे माँटेसरी शिक्षण प्रसारास पुष्कळच चालना मिळाली. डॉ. माँटेसरी आपल्या देशातून हद्दपार होवून तेथे आल्या तेंव्हा त्यांना स्वताच्या पद्धतीचा प्रसार करण्यासाठी तयार असलेले क्षेत्र मिळाले.[७] १९४७ मध्ये मुलांसाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्यात आले. १९७५ मध्ये लागू करण्यात आलेल्या या धोरणांतर्गत, एकात्मिक बाल विकास सेवा (इंग्लिश: Integrated Child Development Services) या योजनेत देशातील ० ते ६ वयोगटातील बालकांच्या पोषण आणि आरोग्याची काळजी घेतली जाते.[८]
महाराष्ट्रातील अंगणवाडी शिक्षणाची पार्श्वभूमी
संपादनभारत सरकारच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र राज्यात दिनांक २ ऑक्टोबर १९७५ रोजी अमरावती जिल्ह्यातील धारणी व मुंबई येथील धारावी या दोन प्रकल्पात बालकांच्या पोषण व आहाराचा दर्जा सुधारण्यासाठी त्यासोबतच बालमृत्यूचे व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी या योजनेची योजनेची सुरुवात करण्यात आली होती. आजपर्यंत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पात वाढ झाली आहे.
प्रकल्प
- नागरी प्रकल्प १०४
- ग्रामीण/आदिवासी ४४९
- एकूण ५५३
राज्यातील मंजूर अंगणवाडी केंद्र
- अंगणवाडी केंद्र ९७४७५
- मिनी अंगणवाडी केंद्र १३०११
- एकूण अंगणवाडी केंद्र ११०४८६
सेवा
संपादनसद्यस्थितीत एकात्मिक बाल विकास सेवा योजनंतर्गत अंगणवाडीतील लाभार्थ्यांना ६ सेवा पुरविण्यात येत आहेत.
- पूरक पोषण आहार
- लसीकरण
- आरोग्य तपासणी
- संदर्भसेवा
- अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण
- आरोग्य व आहार शिक्षण
कार्यरत यंत्रणा
संपादनग्रामीण
- तालुका स्तर बाल विकास प्रकल्प अधिकारी
- बीट स्तर पर्यवेक्षिका
- अंगणवाडी केंद्र अंगणवाडी सेविका व मदतनीस
- मिनी अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका
नागरी
- प्रकल्प स्तर बाल विकास प्रकल्प अधिकारी
- बीट स्तर मुख्यसेविका
- अंगणवाडी केंद्र अंगणवाडी सेविका व मदतनीस
संदर्भ
संपादन- ^ "Government plans to upgrade 2.5 lakh anganwadi centres in next 5 years: Women and Child Development Ministry official". economictimes.indiatimes.com (English भाषेत). 17 December 2019. 9 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "अंगणवाडीची कार्ये". womenchild.maharashtra.gov.in (Marathi भाषेत). 9 November 2022. 9 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "लॉकडाऊनमुळे अंगणवाडीसेविका आर्थिक संकटात". Marathi.thewire.in (Marathi भाषेत). 24 April 2020. 9 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस)". loksatta.com (Marathi भाषेत). 9 November 2022. 9 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "गिजू भाई बधेका का शैक्षिक चिन्तन एवं आधुनिक भारतीय बाल" (PDF). gijubhaibadheka.in (hindi भाषेत). 9 November 2022. 9 November 2022 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 9 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "TARABAI MODAK - MARATHI - PADMAJA PHATAK" (PDF). Wayback Machine (Marathi भाषेत). 9 November 2022. 9 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "जगातील अंगणवाडी शिक्षणाची पार्श्वभूमी" (PDF). ir.unishivaji.ac.in (Marathi भाषेत). 9 November 2022. 9 November 2022 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 9 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Integrated Child Development Scheme (ICDS)" (PDF). cdn.s3waas.gov.in (English भाषेत). 9 November 2022. 9 November 2022 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 9 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "राज्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प" (PDF).[permanent dead link]