संजय थुम्मा

भारतीय आचारी


संजय थुम्मा (२६ एप्रिल, १९७० - ) हा एक भारतीय आचारी आहे. तो एक भारतीय आचारी (शेफ) आणि स्वयंपाकाच्या संकेतस्थळ, व्हेरहवाह डॉट कॉम या संकेतस्थळाचा संस्थापक आहे.[] तो युरोप, ऑस्ट्रेलिया आणि उत्तर अमेरिकेतील भारतीय लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्याने २००७ मध्ये सुरू केलेल्या यूट्यूबवरील त्याच्या ऑनलाइन रेसिपी चॅनेलसाठी प्रसिद्ध झाला. या चॅनेलचे १०० दशलक्षपेक्षा जास्त वेळा त्याचे व्हिडीओ बघितले गेले.[]

संजय थुम्मा
जन्म २६ एप्रिल, १९७० (1970-04-26) (वय: ५४)
हैदराबाद, तेलंगणा, भारत
शिक्षण हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा, आयएचएम, हैदराबाद
संकेतस्थळ
http://www.vahrehvah.com

सुरुवातीचे जीवन

संपादन

संजयचा जन्म हैदराबादमध्ये झाला. तो फक्त ७ वर्षांचा असताना स्वयंपाकात त्याची रुची निर्माण झाली. त्याची आई त्याला स्वयंपाकघरात गुंतवून ठेवत असे जेणेकरून तो आपल्या भावंडांना त्रास देऊ नये. त्याची पहीली पाककृती डोसा आणि स्क्रॅम्बल अंडी होती. जेव्हा त्याची आई काही काळासाठी आजारी होती तेव्हा त्याची स्वयंपाक करण्याची इच्छा वाढली.[] त्यांने आयएचएम हैदराबाद येथून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा मिळविला. त्याचे लग्न रागिनीशी झाले आहे, जी एक आचारी आहे. त्याला एक मुलगा आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ Murthy, Neeraja (20 June 2013). "Cooking it up virtually". The Hindu. 25 February 2019 रोजी पाहिले.
  2. ^ It’s cooking on YouTube Archived 2011-04-27 at the Wayback Machine. The Hindu, 25 April 2009.
  3. ^ Vidya, Bisket. "9 Things You Should Know About Vah Chef, Sanjay Thumma!". Chai Bisket (इंग्रजी भाषेत). 2017-11-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-05 रोजी पाहिले.