संगीत मत्स्यगंधा
दि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित ‘सं. मत्स्यगंधा’ हे प्रा. वसंत कानेटकर लिखित नाटक आहे. पं. जितेंद्र अभिषेकी यांंनी या नाटकाला संंगीत दिले आहे. महाभारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची घटना या नाटकात मांंडण्यात आली आहे.हे नाटक सर्वप्रथम १ मे १९६४ रोजी रंगभूमीवर आले. [१]
कथानक
संपादनमहाभारतातील हे कथानक आपल्याला देवव्रत अर्थात भीष्माचार्य आणि त्यांच्या वडिलांची अर्थात राजा शंतनूची पत्नी सत्यवती अर्थात मत्स्यगंधा ह्यांच्या जीवनात नेते. पराशर मुनींवर प्रेम करणारी सत्यवती प्रेमभंगामुळे निष्ठुर होते. तिच्या निष्ठुर सूडबुद्धीचे अतिशय घातक परिणाम तिच्यासह देवव्रताला आणि खुद्द सत्यवतीसह अनेकांना भोगावे लागतात. फार गहन आशयाचे हे कथानक असून अप्रतिम संगीत आणि संवादांनी परिपूर्ण असे हे नाटक आहे. [२]
कलाकार
संपादनमूळ नाटकात रामदास कामत, आशालता वाबगावकर, मा. दत्ताराम ह्यांच्या मुख्य भूमिका होत्या.
सध्या संपदा जोगळेकर ह्यांनी पुनश्च सादर केलेल्या नव्या नाटकातील कलाकार पुढीलप्रमाणे आहेत. [३]
- केतकी चैतन्य
- नचिकेत लेले
- राहुल मेहेंदळे
- पूजा राईबागी
- अमोल कुलकर्णी
- संजीव तांडेल
- शशी गंगावणे
नाट्यपदे
संपादनह्या नाटकातील पदे पुढीलप्रमाणे होत. [४]
- साद देती हिमशिखरे
- गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी
- गर्द सभोती रान साजणी, तू तर चाफेकळी
- तव भास अंतर झाला मन रमता मोहना
- नको विसरू संकेत मिलनाचा
- अर्थशून्य भासे मज
- जन्म दिला मज ज्यांनी
- देवाघरचे ज्ञात कुणाला
संदर्भ
संपादन- ^ ‘सं. मत्स्यगंधा’ : आत्मभानाची नियतीगत शोकांतिका https://www.loksatta.com/manoranjan-news/drama-sangeet-matsyagandha-review-by-ravindra-pathare-1587676/
- ^ सं. मत्स्यगंधा : स्मरणरंजनाचा सुरेख अनुभव https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-drama/sangeet-matsyagandha/articleshow/61253433.cms Archived 2019-06-20 at the Wayback Machine.
- ^ ‘सं. मत्स्यगंधा’ : आत्मभानाची नियतीगत शोकांतिका https://www.loksatta.com/manoranjan-news/drama-sangeet-matsyagandha-review-by-ravindra-pathare-1587676/
- ^ नाटक संगीत मत्स्यगंधा - पदे https://www.aathavanitli-gani.com/Natak/Matsyagandha