षडंश (Sextans) एक लहान तारकासमूह आहे. जोहानस हेवेलिअस यांनी १६८७ साली याची व्याख्या केली होती.

षडंश
तारकासमूह
षडंश मधील ताऱ्यांची नावे
लघुरुप Sex
प्रतीक सेक्स्टन्ट
विषुवांश १०
क्रांती
चतुर्थांश एसक्यू२
क्षेत्रफळ ३१४ चौ. अंश. (४७वा)
मुख्य तारे
बायर/फ्लॅमस्टीड
तारे
२८
ग्रह असणारे तारे
३.००m पेक्षा तेजस्वी तारे
१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे
सर्वात तेजस्वी तारा α सेक्स (४.४९m)
सर्वात जवळील तारा एलएचएस २९२
(१४.८० ly, ४.५४ pc)
मेसिए वस्तू शून्य
उल्का वर्षाव सेक्स्टँटिड्स
शेजारील
तारकासमूह
सिंह
वासुकी
चषक
+८०° आणि −९०° या अक्षांशामध्ये दिसतो.
एप्रिल महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो.

वैशिष्ट्ये

संपादन

षडंश खगोलावरील अंधुक आणि विरळ जागेत आहे. त्याच्यामध्ये ५ पेक्षा तेजस्वी दृश्यप्रतीचा α सेक्स्टँटिस हा एकच तारा आहे. त्याची दृश्यप्रत ४.४९ आहे. याच्यामध्ये γ, ३५, आणि ४० सेक्स्टँटिस सारखे काही द्वैती तारे आहेत. त्याचबरोबर β, २५, २३ सेक्स्टँटिस आणि एलएचएस २९२ सारखे काही चलतारे आहेत. एनजीसी ३११५ ही एज-ऑन मसूराकार दीर्घिका ही एक दूर अंतराळातील वस्तू आहे. हा तारकासमूह क्रांतिवृत्ताजवळ आहे. त्यामुळे चंद्र आणि काही ग्रह कधीकधी काही काळासाठी त्याच्यामध्ये असतात.

या तारकासमूहामध्ये हबल दुर्बिणीने सुरू केलेल्या कॉसमॉस प्रकल्पाचे क्षेत्र आहे.

सेक्सटन्स बी ही एक तेजस्वी आकारहीन बटू दीर्घिका आहे. तिची दृश्यप्रत ६.६ असून ती पृथ्वीपासून ४.३ दशलक्ष प्रकाश-वर्षे अंतरावर आहे. ती दीर्घिकांच्या स्थानिक समूहाचा एक भाग आहे.[1]

सीएल जे१००१+०२२० हा २०१६ पर्यंत ज्ञात असलेला सर्वात लांबचा दीर्घिकांचा समूह आहे. त्याचा रेडशिफ्ट २.५०६ आहे, म्हणजेच तो पृथ्वीपासून ११.१ अब्ज प्रकाशवर्षे अंतरावर आहे.[]

चित्रदालन

संपादन
 
नुसत्या डोळ्यांनी दिसणारे षडंश.
नुसत्या डोळ्यांनी दिसणारे षडंश.
 
 
वासुकीच्या च्या आसपासचे तारकासमूह. उर्निआज् मिरर (१८२५) मधून
वासुकीच्या च्या आसपासचे तारकासमूह. उर्निआज् मिरर (१८२५) मधून
 
 
कॉसमॉस रेडशिफ्ट ७: आरंभकाळच्या विश्वातील एक तेजस्वी दीर्घिका (कलात्मक चित्र).
कॉसमॉस रेडशिफ्ट ७: आरंभकाळच्या विश्वातील एक तेजस्वी दीर्घिका (कलात्मक चित्र).
 

संदर्भ

संपादन
  1. ^ Wang, Tao; Elbaz, David; Daddi, Emanuele; Finoguenov, Alexis; Liu, Daizhong; Schrieber, Corenin; Martin, Sergio; Strazzullo, Veronica; Valentino, Francesco; van Der Burg, Remco; Zanella, Anita; Cisela, Laure; Gobat, Raphael; Le Brun, Amandine; Pannella, Maurilio; Sargent, Mark; Shu, Xinwen; Tan, Qinghua; Cappelluti, Nico; Li, Xanxia (2016).
  • Levy, David H. (2005). Deep Sky Objects. Prometheus Books. ISBN 1-59102-361-0. 
  • Ian Ridpath and Wil Tirion (2007). Stars and Planets Guide, Collins, London. ISBN 978-0-00-725120-9. Princeton University Press, Princeton. ISBN 978-0-691-13556-4.