श्रुतसेन हा इंद्रप्रस्थाचा कुमार सहदेव व राणी द्रौपदी यांचा पुत्र होता.

श्रुतसेन आपल्या वडिलांप्रमाणे विद्वान होता.

कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या सुरुवातीस शकुनीने श्रुतसेनाचा पराभव केला. त्यानंतर १४व्या दिवशी श्रुतसेनाने भूरिश्रवसच्या लहान भावास श्रुतसेनाने मारले.[१] युद्धाच्या शेवटी दुश्मनर आणि दुर्मुखाशी युद्ध करून त्याने देवव्रद्धाच्या मुलासही मारले.[२]

युद्धाच्या शेवटच्या रात्री दुर्योधनाच्या मृत्यूनंतर अश्वत्थामाने कृतवर्मा आणि कृपाचार्य यांच्यासह पांडवांवर निर्वाणीचा हल्ला चढवला. अंधारात झालेल्या या लढाईत आपल्या चार सावत्र भावांसह श्रुतसेन मृत्यू पावला.

  1. ^ Parmeshwaranand, Swami (2001). Encyclopaedic dictionary of Purāṇas (1st ed.). New Delhi: Sarup & Sons. ISBN 9788176252263.,
  2. ^ "Shrutakarma, Śrutakarmā: 3 definitions". 21 September 2015.