श्री ४२०

१९५५ चा भारतीय चित्रपट


श्री ४२० हा १९५५ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. राज कपूर ह्यांनी दिग्दर्शन व निर्मिती केलेल्या ह्या चित्रपटामध्ये स्वतः राज कपूरनर्गिस ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. १९५५ सालामधील सर्वात यशस्वी ठरलेल्या श्री ४२० मधील मुकेशने गायलेले मेरा जूता है जपानी हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले.

श्री ४२०
दिग्दर्शन राज कपूर
निर्मिती राज कपूर
कथा ख्वाजा अहमद अब्बास
प्रमुख कलाकार राज कपूर
नर्गिस
नादिरा
गीते शैलेंद्र
संगीत शंकर जयकिशन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ६ सप्टेंबर १९५५

भारताव्यतिरिक्त श्री ४२० सोव्हिएत संघ, इस्रायल, रोमेनिया इत्यादी देशांमध्ये देखील यशस्वीपणे चालला.

बाह्य दुवे

संपादन