श्री हिंगुलअंबिका देवालय
'''श्री हिंगलाज माता''' भावसार क्षत्रिय समाजाची कुलस्वामिनी देवी आहे. हिचे मूळ स्थान पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांताच्या वाळवंट प्रदेशातील हाव नदीच्या पलीकडे आहे. चंद्रकृपतीर्थ स्थानावर मकरंद पर्वतशिखरावर दुर्गम व कठीण अशा हिंगलाज गुहेत स्वयंभू अग्नी व ज्योतीच्या प्रकाशात हिंगलाज मातेचे मूळ स्थान आहे .
इतिहास
संपादनदक्ष प्रजापतीच्या यज्ञात देवी सतीने क्रोधाने यज्ञात आत्मसमर्पण केल्यावर पृथ्वीतलावर ५२ विविध ठिकाणी प्रमुख शक्तिपीठांची निर्मिती झाली.या शक्तीपिठातील प्रमुख अग्रगण्य शक्तीपीठ म्हणजेचं हिंगलाज आग्नेय तीर्थ शक्ती पीठ आहे . अनेक देवता,ऋषीमुनी, सिद्धपुरुष,देवी भक्तांचे पवित्र व पूजनीय व जागृत असे हे शक्ती पीठ आहे .
रचना
संपादन- मंदिराची वास्तू: मंदिराची वास्तू ही मोठी असून ,त्यामध्ये कोरीव नक्षीकाम आहे. बांधकाम हे दगडी आहे.मंदिराबाहेर एक दीपमाळा आहे .
- मूर्ती: श्री हिंगलाज मातेची मूर्ती ही ३ फुट उंचीची असून ती अत्यंत मोहक व स्मितवंदन आहे. मूर्तीची आजूबाजूची जागा चांदीने मढवलेली आहे.